मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचे (Indian Premier League) काउंटडाऊन सुरू झाले आहे. 26 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार असून, त्यासाठी आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. बुधवारी महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) आणि आयपीएलशी संबंधित अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली, ज्यामध्ये आयपीएलशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी मुंबईत (Mumbai) एकूण 55 सामने होणार आहेत, त्यामुळे 8 मार्चपासून संघ मुंबईत पोहोचण्यास सुरुवात होईल. यानंतर हे खेळाडू क्वारंटाइन असतील. त्यानंतर 14 ते 15 मार्चपर्यंत आयपीएल संघ सराव करू शकतील. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, आयपीएल खेळण्यासाठी येणाऱ्या सर्व खेळाडूंना 3 ते 5 दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. मुंबईत दाखल होण्यापूर्वी प्रत्येकाला RT-PCR चाचणी स्वतःच्या घरी करून घ्यावी लागेल.
ठाण्यातील रिलायन्स कॉर्पोरेट पार्क, एमसीए मैदानावर संघांना सरावाची संधी दिली जाईल. कारण आयपीएलचे सर्व साखळी सामने केवळ चार स्टेडियममध्ये खेळवले जाणार असल्याने संघांना सरावासाठी स्वतंत्र सुविधा देण्यात आल्या आहेत. आयपीएल 26 मार्चपासून सुरू होणार असून ही स्पर्धा 29 मे पर्यंत चालणार आहे. आयपीएलमध्ये एकूण 70 लीग सामने खेळवले जाणार आहेत, यावेळी एकूण 12 डबल हेडर सामने असू शकतात. म्हणजेच 12 दिवस असे असतील ज्या दिवशी दोन सामने खेळवले जातील.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 20 सामने होणार आहेत, तर 15 सामने सीसीआय स्टेडियमवर होणार आहेत, याशिवाय 20 सामने डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर एकूण 15 सामने होणार आहेत.यावेळी आयपीएलमध्ये एकूण 10 संघ सहभागी होत असून, त्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. गट-अ मध्ये मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, लखनौ सुपर जायंट्स हे संघ आहेत. तर ब गटात चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात होत असलेल्या आयपीएल स्पर्धेच्या सामन्यांसाठी स्पर्धेच्या सुरुवातीच्या दिवसांत स्टेडियममध्ये 25 टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारने आपला निर्णय जाहीर केला आहे. आठ दिवसांनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन स्टेडियममध्ये 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्याची राज्य सरकारची तयारी आहे. येत्या 26 मार्चपासून IPL सामन्यांना सुरूवात होणार आहे 22 मेपर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच मुंबई प्रीमियर लीगचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीत आज दुपारी 12:30 वाजता सह्याद्री अतिथी गृह येथे बैठक पार पडली. या बैठकीत स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीस परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संघांना हॉटेलमधून सामने खेळताना आणि सरावासाठी जाताना रहदारीचा सामना करावा लागणार नाही. संघांच्या वाहतुकीसाठी रस्त्यांवर स्वतंत्र लेन असेल. मुंबईतील वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर 55 सामने खेळवले जाणार आहेत. याशिवाय 15 सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहेत. बीसीसीआयने सराव सुविधांसाठी वांद्रे-कुर्ला संकुल आणि ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमची निवड केली आहे.
इतर बातम्या
ICC T20 Rankings: श्रेयस अय्यरची मोठी झेप, विराट, रोहित टॉप-10 मधून बाहेर
चिनला जमलं नाही ते विराट कोहली करणार? 100 व्या कसोटीत ‘महा’शतकाची प्रतीक्षा