मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2022 चे वेळापत्रक (IPL 2022 Schedule) जाहीर करण्यात आले आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स (CSK Vs KKR) यांच्यात 26 मार्च रोजी पहिला सामना होणार आहे. पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहायला मिळेल, जो संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. आयपीएल 2022 लीगचा (Indian Premier League) शेवटचा सामना 22 मे रोजी संध्याकाळी 7.30 वाजता वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. ज्यामध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्जचे हे दोन संघ आमनेसामने असतील. यावर्षी लीगमधील सर्व सामने देशातच खेळवले जाणार आहेत. लीग राऊंडमधील सर्व 70 सामने मुंबई आणि पुण्याच्या स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. मुंबईत वानखेडे, डीवाय पाटील आणि ब्रेबॉर्न या तीन स्टेडियम्सवर सामने होणार आहेत. पुण्यात 15 मॅचेस होतील. सर्व संघ वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडियमवर प्रत्येकी चार-चार सामने खेळतील. त्याशिवाय पुणे आणि ब्रेबॉर्न प्रत्येक संघाचे तीन-तीन सामने होतील.
यंदा आयपीएलचे सर्व सामने महाराष्ट्रात होत असल्याने मुंबई इंडियन्सला त्यांचं होम ग्राऊंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर खेळताना खूप फायदा होईल, असा सूर इतर फ्रँचायझींमध्ये होता. त्यामुळे काही फ्रँचायझींना असं वाटत होतं की, मुंबई इंडियन्सचे सामने वानखेडेवर आयोजित केले जाऊ नयेत. अथवा तिथे मुंबईचे सामने कमी असायला हवेत, अशीही मागणी इतर संघांच्या चाहत्यांची होती. त्यानुसार मुंबईचे बहुतांश सामने ब्रेबॉर्न स्टेडियम, डीवाय पाटील स्टेडियम आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहेत. त्याचबरोबर मुंबईला त्यांचं होम ग्राऊंड असलेल्या वानखेडेच्या मैदानात 4 सामने खेळायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे मुंबईचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी असलेल्या चेन्नई सुपरकिंग्ससोबतचा सामनादेखील वानखेडेवर खेळवला जाणार आहे.
? NEWS ?: The Board of Control for Cricket in India (BCCI) announced the schedule for #TATAIPL 2022 which will be held in Mumbai and Pune.
A total number of 70 league matches and 4 Playoff games will be played in the duration of 65 days.
More Details ?
— IndianPremierLeague (@IPL) March 6, 2022
इतर बातम्या