मुंबई : आज आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमधील सामना हैदराबादने (SRH) जिंकला आहे. सनराइजर्स हैदराबादचा कोलकाता नाईट रायडर्सवर (KKR) मोठा विजय झाला आहे. हैदराबादने 17 ओवर 3 बॉलमध्ये तीन बाद 176 धावा काढल्या आणि विजय खेचून आणला आहे. हैदराबादचा कोलकात्यावर हा मोठा विजय मानला जातो आहे. आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये हैदराबाद संघात सर्वाधिक 71 धावा राहुल त्रिपाठीने काढल्या आहेत. राहुलने 37 बॉलमध्ये 71 धावा काढल्या आहेत. त्यामध्ये सहा षटकार आणि चार चौकारांचा समावेश आहे. त्या पाठोपाठ 68 धावा एडन मार्करामने काढल्या आहे. त्याने 36 बॉलमध्ये 68 धावा काढल्या. यामध्ये सहा षटकार आणि चार चौकारांचा समावेश आहे. त्यानंतर सत्रा धावा विलियमसन याने काढल्या. त्याने 16 बॉलमध्ये 17 धावा काढल्या आहेत. त्यामध्ये चार चौकारांचा समावेश आहे.
THREE WINS IN A ROW! AIDEN FINISHES OFF WITH A MAXIMUM! ??? #SRHvKKR #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 15, 2022
A look at the Points Table after Match 2⃣5⃣ of the #TATAIPL 2022 ? #SRHvKKR pic.twitter.com/u2fKAJ1ifo
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2022
Not our night.#KKRHaiTaiyaar #SRHvKKR #IPL2022 pic.twitter.com/rlLVjGDrTK
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 15, 2022
कोलकाता नाईट रायडर्सने हैदराबादला 176 धावांचं लक्ष्य दिलं होतं. आहैदराबादने टॉस जिंकत कोलकाताला पहिल्यांदा फलंदाजीचं निमंत्रण दिलं. कोलकताच्या संघाने 20 ओवरमध्ये 8 बाद 175 धावा केल्या होत्या. नितीश राणाने 36 बॉलमध्ये सर्वाधिक 54 धावा काढल्या. नितीशने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. यानंतर आंद्रे रसेलने 25 बॉलमध्ये 49 धावा काढल्या. यामध्ये रसेलने 4 चौकार आणि 4 षटकार मारले. रसेलनंतर सर्वाधिक धावा श्रेयस अय्यरने धावा काढल्या. त्याने 25 बॉलमध्ये 28 धावा काढल्या असून 3 चौकार मारले आहेत. त्यानंतर फिंचने 5 बॉलमध्ये 7 धावा आणि 1 षटकार मारला. तर जॅक्सनने देखील 7 धावा काढून 1 षटकार मारला. नरेनने 2 बॉलमध्ये 6 धावा काढल्या. त्यापैकी 1 षटकार होता. तर व्यंकटेश अय्यरने देखील 6 धावा काढल्या. त्यापैकी 1 चौकार त्याने मारला. यानंतर अमन खान याने 5 धावा, कमिंसने 3 आणि उमेशने फक्त 1 रन काढलाय. हैदराबादला अशा प्रकारे कोलकाता नाईट रायडर्सने 176 धावांचं लक्ष्य हैदराबादने पूर्ण करुन विजय मिळवला आहे.
इतर बातम्या
दादर स्टेशनबाहेर गदग-पद्दुचेरी एक्सप्रेसची धडक; एकाच रुळावरुन जात असल्याने अपघात, जीविताहानी नाही
दादर रेल्वे स्थानकाजवळ दोन रेल्वे एकमेकांवर आदळल्या, सर्व प्रवासी सुखरूप