मुंबई : कोलकाता नाईट रायडर्सने हैदराबादला 176 धावांचं लक्ष्य दिलं आहे. आजच्या सामन्यात हैदराबादने टॉस जिंकत कोलकाताला पहिल्यांदा फलंदाजीचं निमंत्रण दिलं. कोलकताच्या संघाने 20 ओवरमध्ये 8 बाद 175 धावा केल्या. नितीश राणाने 36 बॉलमध्ये सर्वाधिक 54 धावा काढल्या. नितीशने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. यानंतर आंद्रे रसेलने 25 बॉलमध्ये 49 धावा काढल्या. यामध्ये रसेलने 4 चौकार आणि 4 षटकार मारले. रसेलनंतर सर्वाधिक धावा श्रेयस अय्यरने धावा काढल्या. त्याने 25 बॉलमध्ये 28 धावा काढल्या असून 3 चौकार मारले आहेत. त्यानंतर फिंचने 5 बॉलमध्ये 7 धावा आणि 1 षटकार मारला. तर जॅक्सनने देखील 7 धावा काढून 1 षटकार मारला. नरेनने 2 बॉलमध्ये 6 धावा काढल्या. त्यापैकी 1 षटकार होता. तर व्यंकटेश अय्यरने देखील 6 धावा काढल्या. त्यापैकी 1 चौकार त्याने मारला. यानंतर अमन खान याने 5 धावा, कमिंसने 3 आणि उमेशने फक्त 1 रन काढलाय. हैदराबादला अशा प्रकारे कोलकाता नाईट रायडर्सने 176 धावांचं लक्ष्य दिलंय.
नितीश राणाने 36 बॉलमध्ये सर्वाधिक 54 धावा काढल्या. नितीशने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. यात नितीशचं अर्धशतक झालं आहे.
Classy. Crucial. Clutch.
50 up for Ranaji! ?#KKRHaiTaiyaar #SRHvKKR #IPL2022
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 15, 2022
कोलकाता नाईट रायडर्सला हैदराबादचा संघ भारी पडू शकतो, असं बोललं जातंय. कारण पाच सामन्यांपैकी दोन सामने कोलकाता नाईट रायडर्स हरला आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात कोलकाता एकूण पाच सामने खेळला आहे. त्या पाच सामन्यांपैकी तीन सामने कोलकाता जिंकला आहे. तर उरलेल्या दोन सामन्यात कोलकात्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आपलं दुसरं स्थान कायम ठेवण्यासाठी केकेआर प्रयत्न करणारच. मात्र, संघाच्या चांगल्या कामगिरीवर बरंच काही अवलंबून आहे. आयपीएलमध्ये काहीही होऊ शकतं असं बोललं जातं. त्यामुळे आज कायं होतं, याकडे विशेष लक्ष असणार आहे.
इतर बातम्या
Dadar Train: मोठी बातमी! दादरजवळ दोन ट्रेनच्या इंजिनची टक्कर, वाहतूक विस्कळीत
Special Report: भाजप नेत्यांनाच कोर्टात दिलासा? मविआच्या नेत्यांना दिलासा मिळत नाही?