मुंबई : आयपीए 2022 (IPL 2022) ही स्पर्धा अवघ्या तीन दिवसांनी सुरू होणार आहे. इंडियन प्रीमियर लीगचा 15 वा सीझन 26 मार्चपासून सुरू होणार आहे. अनेक खेळाडू या लीगमध्ये खेळण्याची संधी मिळावी म्हणून प्रयत्न करत असतात. अनेक मोठ्या देशांचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळतात परंतु छोट्या देशांतील खेळाडूंना आयपीएल खेळण्याची संधी मिळत नाही. आता झिम्बाब्वेचा एक खेळाडू या वेळी आयपीएलमध्ये आपले रंग दाखवणार आहे. ब्लेसिंग मुजरबानी (Blessing Muzarabani) असे या खेळाडूचे नाव आहे. मुजरबानी आयपीएलमध्ये लखनौ सुपरजायंट्सकडून (lucknow Supergiansts) खेळताना दिसणार आहे.
ब्लेसिंग भारतात रवाना झाला आहे. झिम्बाब्वेमधील भारताच्या राजदूतांनी मुजरबानी याची भेट घेऊन त्याला शुभेच्छा दिल्या. राजदूताने लखनौ सुपरजायंट्सच्या संघालाही शुभेच्छा दिल्या आहेत.
मुजारबानी सध्या झिम्बाब्वेच्या प्रतिभावान खेळाडूंपैकी एक आहे. त्याने पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये आपले कौशल्य दाखवून दिले आहे. त्याने पाकिस्तान सुपर लीगमध्ये भाग घेतला होता. PSL मध्ये त्याने चार सामन्यांमध्ये पाच विकेट घेतल्या आणि आठ पेक्षा कमी इकॉनॉमीने धावा दिल्या. तो इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळला आहे. त्याच्याकडे 140 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे.
आपण मुजारबानीच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर लक्षात येईल की हा एक प्रतिभावान खेळाडू आहे. त्याने आपल्या देशासाठी 21 टी-20 सामने खेळले आहेत आणि त्यात त्याने 25 बळी घेतले आहेत. त्याचवेळी, त्याने 30 एकदिवसीय सामन्यांमध्ये आपल्या देशाचं प्रतिनिधीत्व केलं आहे आणि त्यात 39 बळी घेतले आहेत. मुजरबानीने सहा कसोटी सामन्यांमध्ये संघाचे प्रतिनिधित्व केले आहे आणि त्यात 19 बळी घेतले आहेत.
Ambassador met with Mr Blessing Muzarabani, the Zimbabwean bowler, as he prepared to leave for #IPL2022.
Ambassador wished him & his team #LucknowSuperGiants the very best. #IndiaAt75 @IndianDiplomacy @MEAIndia @iccr_hq pic.twitter.com/8AMPO9Xbyd
— India in Zimbabwe (@IndiainZimbabwe) March 21, 2022
लखनौने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडला 7.5 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते, मात्र दुखापतीमुळे तो या हंगामात खेळू शकणार नाही. संघ त्याच्या बदलीच्या शोधात आहे. अशा परिस्थितीत मुजरबानी हा त्यांच्यासाठी पर्याय ठरू शकतो. दोघांचा वेग सारखाच आहे. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या बहुतांश खेळाडूंनी मुजरबानीच्या चेंडूंचा सामना केलेला नाही, त्यामुळे ते सरप्राईज पॅकेजही ठरू शकतं.
इतर बातम्या
IPL 2022: मयंती परत येतेय, टीम इंडियातील क्रिकेटपटूची पत्नी
kieron pollard Mumbai Indians: ‘तात्या ऑन फायर’, पहा पोलार्डचे ‘कडक’ फटके VIDEO