बंगळुरु | आयपीएल 16 व्या मोसमाला धडाक्यात सुरुवात झाली आहे. या मोसमातील पहिल्या रविवारी (2 एप्रिल) डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं आहे. या डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात दोन दिग्गज आणि अनुभवी खेळाडू आमनेसामने भिडणार आहेत. रविवारी होणाऱ्या दुसऱ्या डबल हेडरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने भिडणार आहेत. फॅफ डु प्लेसिस याच्याकडे आरसीबीच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. तर हिटमॅन रोहित शर्मा ‘पलटण’चं नेतृत्व करणार आहे. या सामन्यात रोहित आणि विराट यांच्या दोघांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. या सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
आरसीबी विरुद्ध एमआय यांच्यातील सामना हा 2 एप्रिल रोजी खेळवण्यात येणार आहे.
बंगळुरु विरुद्ध मुंबई यांच्यातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस उडवण्यात येईल.
बंगळुरु विरुद्ध मुंबई या उभयसंघातील साम्याचं आयोजन हे एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये करण्यात आलंय.
आरसीबी विरुद्ध मुंबई यांच्यातील हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. तसेच मोबाईलवर जिओ सिनेमावर मॅच पाहता येईल.
मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, जोफ्रा आर्चर आणि जसप्रीत बुमराह.
आरसीबी टीम | फॉफ डुप्लेसी (कर्णधार), विराट कोहली, हिमांशु शर्मा, विल जॅक्स, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, अनुज रावत, वानिंदु हसरंगा, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोर , मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड, सिद्धार्थ कौल, रीस टॉपले, मनोज वानखेडे, राजन कुमार, अविनाश सिंह, सोनू यादव, आकाश वशिष्ठ आणि आकाश दीप.