मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत गुजरात टायटन्सची जबरदस्त कामगिरी राहिली आहे. आता गुणतालिकेत अव्वल स्थानी असून प्लेऑफमधील स्थानही निश्चित केलं आहे. सनराईजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात शुभमन गिलची बॅट चांगलीच तळपली. त्याने टी 20 क्रिकेटमधली तिसरी आणि आयपीएल मधलं पहिलं शतक झळकावलं आहे. शुभमन गिलने 58 चेंडूत 101 धावा केल्या. या खेळीत 13 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे त्याची फलंदाजी पाहून आजी माजी क्रिकेटपटूंनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला आहे. विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
“जिथे क्षमता आहे तिथे गिल आहे. आता पुढे जा आणि पुढच्या पिढीचं नेतृत्व कर. देव तुम्हाला आशीर्वाद देईल.”, असं विराट कोहलीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये म्हंटलं आहे. तसेच शुभमन गिलला टॅग केलं आहे.
आयपीएल 2023 स्पर्धेत शुभमन गिल चांगल्या फॉर्मात आहे. या स्पर्धेत त्याने एक शतक आणि तीन अर्धशतकं झळकावली आहेत. शुभमन गिलने आयपीएल 2023 स्पर्धेतील 13 सामन्यात एकूण 576 धावा करत दुसरं स्थान गाठलं आहे. यात एका शतकाचा समावेश आहे.
गुजरातचा पूर्ण स्क्वॉड : हार्दिक पंड्या, अभिनव मनोहर, शुभमन गिल, डेविड मिलर, मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, बी साई सुदर्शन, दर्शन नालकंडे, जयंत यादव, प्रदीप सांगवान, राहुल तेवतिया, शिवम मावी, विजय शंकर, अलजारी जोसफ, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, यश दयाल, केन विलियमसन, जोशुआ लिटिल, ओडीन स्मिथ, उर्विल पटेल, केएस भरत आणि मोहित शर्मा.