मुंबई : आता आयपीएल सुरू असून प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. या स्पर्धेतील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळाले. विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील भांडणाचा व्हिडीओही मजबूत गाजला होता. अशातच बिग बी यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो सध्या खूप व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे.
बाॅलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन नेहमीच काहीना काही कारणांमुळे चर्चेत असतात. ते सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. ते त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आताही अमिताभ यांनी एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एक लहान मुलगा अफलातून पद्धतीने क्रिकेट खेळताना दिसत आहे. सध्या अमिताभ यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एक लहान मुलगा क्रिकेट खेळत असून एकामागून एक शॉट्स मारताना दिसत आहे. मुलाची शॅाट्स मारण्याची शैली पाहून अमिताभ बच्चनही त्याच्यावर इम्प्रेस झाले आहेत. ‘भारतीय क्रिकेटचं भवितव्य आता सुरक्षित हातात आहे”, असं हटके कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.
अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकरी लाईक्सचा वर्षाव करत आहेत. तसंच त्या लहान मुलाचं आणि त्याच्या अप्रतिम खेळीचं नेटकरी कौतुक करत आहेत. तसंच हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दरम्यान, आता आयपीएल सुरू असून याआधी वुमन्स प्रीमिअर लीग सुरू असतानाही राजस्थानमधील एका मुलीचा क्रिकेटिंग शॉट्स खेळताना दिसली होती. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरनेही या मुलीचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर शेअर केला होता.