CSK vs RR : राजस्थान विरुद्धचा सामना चेन्नईने जिंकला तर मुंबई आणि कोलकात्याला आणखी एक संधी; कसं ते समजून घ्या

| Updated on: Apr 27, 2023 | 4:24 PM

आयपीएल 2023 स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. प्रत्येक सामना गुणतालिकेचं गणित बदलत आहे. त्यामुळे काही संघांना फायदा तर काही संघांचं नुकसान होत आहे. चला जाणून आजच्या सामन्याचा गुणतालिकेवर काय फरक पडेल.

CSK vs RR : राजस्थान विरुद्धचा सामना चेन्नईने जिंकला तर मुंबई आणि कोलकात्याला आणखी एक संधी; कसं ते समजून घ्या
CSK vs RR : चेन्नईने राजस्थानला पराभूत केल्यास गुणतालिकेत असा पडेल फरक, मुंबई कोलकात्याला मिळेल आणखी एक चान्स
Follow us on

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील 37 वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होत आहे. त्यामुळे या दोन संघात कोण बाजी मारणार? याकडे लक्ष लागून आहे. राजस्थान रॉयल्सने स्पर्धेतील या पूर्वीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा 3 धावांनी पराभव केला होता. त्यामुळे पराभवाचा वचपा काढण्याची चांगली संधी धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सकडे आहे. पण असं असलं तरी चेन्नईचा संघ सामना जिंकावा अशी तळाशी असलेल्या संघांची प्रार्थना आहे. कारण प्रत्येक दोन गुणांमुळे गुणतालिकेचं गणित बदलत आहे.

जेतेपदाच्या दृष्टीने दहापैकी 4 संघांची प्लेऑफमध्ये निवड होणार आहे. त्यामुळे चार संघांसाठी दहा संघाची चुरस आहे. प्रत्येक विजय आणि पराभव महत्त्वाचं ठरत आहे. गुणतालिकेत 10 गुण आणि +0.662 रनरेटसह चेन्नई सुपर किंग्सचा संघ अव्वल स्थानी आहे. त्यानंतर गुजरातचा संघ 10 गुणांसह +0.580 रनरेटसह दुसऱ्या स्थानी आहे.

राजस्थान रॉयल्स 8 गुण आणि +0.844 रनरेटसह तिसऱ्या स्थानी आहे. असं पाहिलं तर लखनऊ, बंगळुरु आणि पंजाबचे आठ गुण आहेत. पण राजस्थानचा रनरेट चांगला असल्याने तिसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे सध्या टॉप फोरमध्ये असलेला एखादा संघ पराभूत झाला तर दुसऱ्या संघांना संधी मिळते. तशी काही स्थिती आहे.

संघमॅचविजय पराभवगुणएनआरआर
गुजरात टायटन्स1410420+0.820
चेन्नई सुपर किंग्स148517+0.652
लखनऊ सुपर जायंट्स 148517+0.284
मुंबई इंडियन्स 148616-0.044
राजस्थान रॉयल्स147714+0.148
आरसीबी 137614-0.128
केकेआर146812-0.229
पंजाब किंग्स146812-0.304
दिल्ली कॅपिटल्स145910-0.808
सनरायजर्स हैदराबाद 134908-0.558

चेन्नईने हा सामना जिंकला तर 12 गुणांसह अव्वल स्थानी राहील. पण राजस्थानने हा सामना जिंकला तर चांगल्या रनरेटमुळे अव्वल स्थानी पोहोचेल. त्यामुळे लखनऊ, बंगळुरु आणि पंजाबचं टेन्शन वाढेल.

दुसरीकडे, मुंबई आणि कोलकात्यासाठी सुपर 4 ची लढत आणखी कठीण होईल. त्यामुळे उर्वरित सर्व सामने जिंकण्याचं आव्हान पेलावं लागेल. दुसरीकडे लखनऊ, बंगळुरु आणि पंजाबने मोठा झटका दिल्यास मुंबई आणि कोलकात्याचं आव्हान संपुष्टात येईल.

चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणाऱ्या सामन्याकडे उर्वरित संघांचं लक्ष आहे. राजस्थानने हा सामना गमावल्यास इतर संघांनी एक संधी मिळेल. त्यामुळे गुणतालिकेत जर तरचं स्थिती निर्माण होईल.

दोन्ही संघाचे खेळाडू

चेन्नईचा पूर्ण स्कॉड : एमएस धोनी, डेवन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, सुभ्रांशु सेनापति, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, के भगत वर्मा, मोइन अली, राज्यवर्धन हंगरगेकर, शिवम दुबे, दीपक चाहर, महीश तीक्षणा, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंह, अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे, बेन स्टोक्स, मथीश पथिराना, शेख रशीद, निशांत सिंधु आणि अजय मंडल.

राजस्थानचा पूर्ण स्क्वॉड : संजू सॅमसन, यशस्वी जायसवाल, शिमरन हेटमायर, दीपक पडिक्कल, जॉस बटलर, ध्रुव जुरेल, रियान पराग, ट्रेंट बोल्ट, ओबेड मॅकॉय, नवदीप सैनी, कुलदीप सेन, कुलदीप यादव, आर अश्विन, युजवेंद्र चहल, केसी करियप्पा, जेसन होल्डर, जेसन होल्डर, एडम झम्पा, जो रूट, डोनोवन फरेरा, केएस आसिफ,अब्दुल पीए, आकाश वशिष्ट,कुणाल राठौर आणि मुरुगन अश्विन.