मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील गुणतालिकेत टॉप चार संघांना प्लेऑफमध्ये संधी मिळणार आहे. मात्र साखळी फेरीतील 57 सामने पार पडल्यानंतरही अजून काही निश्चित नाही. अजूनही दिल्ली संघ सोडला तर इतर नऊ संघांना प्लेऑफमध्ये संधी आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या पराभवानंतर गुणतालिकेचं गणित आणखी किचकट झालं आहे. गुजरात 16 गुणांसह पहिल्या, चेन्नई 15 गुणांसह दुसऱ्या, मुंबई 14 गुणांसह तिसऱ्या आणि राजस्थान 12 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर लखनऊ, बंगळुरु, कोलकाता, पंजाब आणि हैदराबाद संघांनाही तितकीच संधी आहे. इतकंच तर गुजरातने उर्वरित दोन सामने गमावले तर मात्र कठीण होऊन जाईल. त्यात गुजरातला मोठा झटका लागला आहे.
गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे टेन्शन वाढलं आहे. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात एकही षटक टाकलं नाही. या सामन्यापूर्वी हार्दिक पांड्या प्रत्येक सामन्यात गोलंदाजी करत होता. दुखापतीमुळे हार्दिकने गोलंदाजी केली नसल्याचं सांगण्यात येत आहे.
सामन्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक आशिष कपूरने याबाबत स्पष्टीकरन दिलं आहे. पत्रकार परिषदेत याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की, सामन्यापूर्वी गुजरातच्या कर्णधाराला पाठीचा त्रास सुरु झाला. त्यामुळे सामन्यात काही बदल करण्यात आले होते. मोहम्मद शमीसोबत मोहित शर्माने गोलंदाजी केली. पण मुंबई समोर गुजरातचा कोणताच प्लान यशस्वी झाला नाही.
प्लेऑफची महत्त्वाची शर्यत सुरु असताना हार्दिक पांड्याची दुखापत गुजरातसाठी डोकेदुखी ठरू शकते. कारण उर्वरित दोन सामन्यापैकी एक सामना गुजरातला जिंकायचा आहे. हार्दिकची दुखापत किती गंभीर आहे याबाबत आशीष कपूर यांनी काहीच सांगितलं नाही. अशीच दुखापत 2018 आशिया कपमध्ये हार्दिक पांड्याला झाली हाोती. 2019 मध्ये ही दुखापत गंभीर झाली. त्यामुळे त्याचं पुन्हा खेळणं कठीण झालं. हार्दिकने आयपीएल 2022 मध्ये पुनरागमन करत संघाला जेतेपद मिळवून दिलं होतं.
गुजरातचा पूर्ण स्क्वॉड : हार्दिक पंड्या, अभिनव मनोहर, शुभमन गिल, डेविड मिलर, मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, बी साई सुदर्शन, दर्शन नालकंडे, जयंत यादव, प्रदीप सांगवान, राहुल तेवतिया, शिवम मावी, विजय शंकर, अलजारी जोसफ, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, यश दयाल, केन विलियमसन, जोशुआ लिटिल, ओडीन स्मिथ, उर्विल पटेल, केएस भरत आणि मोहित शर्मा.