मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्समध्ये सुरू असलेल्या सामन्यात स्टार खेळाडू विराट कोहली याने झंझावती शतक ठोकलं आहे. गुजरातने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. विराट कोहलीने 61 चेंडूत 101 धावा केल्या, यामध्ये त्याने 13 चौकार आणि 1 षटकार मारला. विराटने आपलं दुसरं शतक केल्यानंतर त्याची पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.
विराटने शतक झळकावताच स्टेडियममध्ये उपस्थित पत्नी अनुष्का शर्मा आनंद व्यक्त करताना दिसली. अनुष्काला फ्लाइंग किस देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयपीएलमधील विराटचे हे सलग दुसरे शतक आहे.
The Moment King Kohli Scored and Anushka Bhabhi Sending Those Flying Kisses ????pic.twitter.com/eYDGVg2ksU
— Dr Khushboo ?? (@khushbookadri) May 21, 2023
शिख धवन, जोस बटलरनंतर सलग 2 शतक ठोकणारा विराट कोहली तिसरा खेळाडू ठरला आहे. आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वाधिक शतक करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. कोहलीने एकूण 7 शतके केली आहेत तर ख्रिस गेल 6 शतकांसह दुसऱ्या स्थानी आहे. विराटने 60 चेंडूंमध्ये 100 धावा केल्या यामध्ये त्याने 13 चौकार आणि 1 षटकार मारला आहे.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल, ऋद्धिमान साहा (W), हार्दिक पांड्या (C), दासून शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी, यश दयाल
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), मायकेल ब्रेसवेल, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, अनुज रावत, दिनेश कार्तिक (W), हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज, विजयकुमार वैशाख