मुंबई : आयपीएल 2023 पर्व एका एका सामन्यानंतर रंगतदार वळणावर येत आहे. असं असलं तरी या स्पर्धेत काही नावं चर्चेत आली आहेत. खासकरून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुनचं. अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून खेळत आहे. गेल्या दोन आयपीएल पर्व त्याने डगआऊटमध्ये बसून सामने पाहीले. त्यानंतर पहिल्या चार सामन्यात त्याला संधी मिळाली नाही. मात्र कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात संधी मिळाली. त्यानंतर सनराईजर्स हैदराबादच्या विरुद्धच्या सामन्यात तर संधीचं सोनं केलं. तसेच एका विकेट्सची नोंद केली. आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने अर्जुनबाबत मोठा खुलासा केला.
क्रिकेटमध्ये 24 वर्षांचं योगदान दिलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही अर्जुनच्या गोलंदाजीला सामोरं गेला आहे. इतकंच काय तर बाद केल्याचा खुलासा सचिन तेंडुलकरने केला आहे. याबाबत खुद्द सचिन तेंडुलकरने खुलासा केला आहे. अर्जुनने लॉर्ड मैदानावर बाद केल्याचं सचिनने सांगितलं. पण त्याला आता आठवण करून देऊ नका, असंही बजावलं.
50 व्या वाढदिवसाआधी सचिन तेंडुलकरने ट्विटर काही प्रश्नांची उत्तरं दिली. पहिल्यांदाच ट्विटरवर #AskSachin या हॅशटॅग अंतर्गत चाहत्यांनी काही प्रश्न विचारले होते. तेव्हा एका चाहत्याने विचारलं की, अर्जुनने कधी आऊट केलं आहे का? त्या प्रश्नावर सचिनने मजेशीर उत्तर देत सांगितलं की, “हो लॉर्डवर एकदा, पण त्याला आठवण करून देऊ नका” गप्प राहा असा इमोजीही टाकला आहे.
Yes, once at Lord's but don't remind Arjun!? https://t.co/Mm3Bf2ZL77
— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 21, 2023
दुसऱ्या चाहत्याने असा प्रश्न विचारला की, क्रिकेटर बनण्यापूर्वी अर्जुनने त्याच्याकडून सल्ला घेतला होता का? त्यावर उत्तर देताना सचिन तेंडुलकरने सांगितलं की, मी अर्जुनला फक्त इतकंच विचारलं होतं की खरंच तू क्रिकेटर बनू इच्छितो.
ARE YOU SURE???????? https://t.co/XkC66ikLru
— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 21, 2023
अर्जुन तेंडुलकरने कोलकात्या विरुद्धच्या सामन्यात दोन षटकं टाकली होती. त्यात त्याने 17 धावा दिल्या होत्या. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्याने तीन षटकं टाकली. पण तिसरं षटक निर्णायक ठरलं. कारण 6 चेंडूत 20 धावा हव्या असताना फक्त 5 धावा देत एक गडी बाद केला.
मुंबईचा पूर्ण स्क्वॉड: रोहित शर्मा, कॅमरुन ग्रीन, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टिम डेविड, पीयूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन आणि ट्रिस्टन स्टब्स.