मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमाला 31 मार्चपासून सुरुवात झाली. या हंगामात एकूण 70 साखळी मॅचेस पार पडणार आहेत. हंगामातील अखेरचा साखळी सामना हा 21 मे रोजी पार पडणार आहे. या एकूण 70 मॅचेसचं आयोजन देशातील 12 विविध स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या हंगामात 31 मार्चपासून ते आतापर्यंत एकूण 28 सामने खेळवण्यात आले आहेत. क्रिकेट चाहते हे आयपीएलच्या या मोसमात गुंतले आहेत. चाहत्यांना दररोज एकसेएक आणि पैसावसूल सामने पाहायला मिळत आहेत. असताना इथे बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे.
बीसीसीआयने आज 21 (एप्रिल) आयपीएलच्या या 16 व्या मोसमातील प्लेऑफ आणि फायनल सामन्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. प्लेऑफ आणि फायनल सामन्याचं 23 मे ते 28 मे दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे. प्लेऑफ आणि फायनल सामन्यांच्या आयोजनाचा मान हा चेन्नई आणि अहमदाबादला मिळाला आहे. याचाच अर्थ मुंबईत प्लेऑफचे सामने होणार नाहीत. त्यामुळे बीसीसीआयने डावललं असल्याचं म्हणत क्रिकेट चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
? NEWS ?
BCCI Announces Schedule and Venue Details For #TATAIPL 2023 Playoffs And Final.
Details ?https://t.co/JBLIwpUZyf
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2023
23 मे, क्वालिफायर -1 | टीम 1 विरुद्ध टीम 2 | एम ए चिदंबरम स्टेडियम.
24 मे, एलिमिनेटर | टीम 3 विरुद्ध टीम 4 |एम ए चिदंबरम स्टेडियम.
26 मे, क्वालिफायर – 2 | एलिमिनेटर विजेता विरुद्ध क्वालिफायर 1 पराभूत टीम.
28 मे, फायनल | क्वालिफायर 1 विजेता विरुद्ध क्वालिफायर 2 विजेता, नरेंद्र मोदी स्टेडियम.
दरम्यान आयपीएलच्या 16 व्या मोसमातील साखळी फेरीतील सामने हे अहमदाबाद, मोहाली, लखनऊ, हैदाराबाद, बंगळुरु, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, जयपूर, मुंबई, गुवाहाटी आणि धर्मशाला इथे आयोजित करण्यात आलं आहेत.
आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या एकूण 10 संघाची विभागणी ही 2 गटांमध्ये करण्यात आली आहे. ग्रुप ए आणि ग्रुप बी असे 2 ग्रुप करण्यात आले आहेत.
मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिट्ल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स.
चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स, सनरायजर्स हैदराबाद, रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स.
दरम्यान इंग्लंडचा सॅम करन हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कोचीत पार पडलेल्या मिनी ऑक्शनमध्ये पंजाब किंग्सने सॅमसाठी 18 कोटी 50 लाख रुपये मोजले. त्यामुळे सॅम या 16 व्या हंगामात कशी कामगिरी करतो, याकडे टीम मॅनेजमेंटचं लक्ष असणार आहे.