मुंबई | आयपीएल 2023 स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आहे. गुजरात टायटन्सने आयपीएल प्लेऑफसाठी क्वालिफाय केलं आहे. तर उर्वरित 3 जागांसाठी संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळतेय. साखळी फेरीतील अवघे काही सामने राहिले आहेत. त्यानंतर प्लेऑफचं गणित स्पष्ट होईल. त्यानंतर प्लेऑफ राऊंडला सुरुवात होईल. यामध्ये क्वालिफायर 1, एलिमिनेटर, क्वालिफायर 2 आणि फायनल असे एकूण 4 सामने पार पडतील. त्यानंतर 28 मे रोजी अंतिम सामना होईल आणि आयपीएल चॅम्पियन मिळेल.
टीम इंडिया आयपीएलनंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळणार आहे. या अंतिम आणि महामुकाबल्याचं आयोजन हे लंडनमधील द केनिंग्टन ओव्हलमध्ये करण्यात आलं आहे. हा महामुकाबला 7 ते 11 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. तर 12 जून राखीव दिवस असणार आहे.
बीसीसीआयने या महाअंतिम सामन्याआधी मोठी खेळी केली आहे. टीम इंडियामध्ये दिग्गजाची एन्ट्री झाली आहे.
बीसीसीआयने अनिल पटेल यांची संघ व्यवस्थापक पदी (टीम मॅनेजर) नियुक्ती केली आहे.
अनिल पटेल यांनी याआधी गुजरात क्रिकेट संघाच्या सचिवपदाची जबाबदारी पार पाडली आहे. याशिवाय 2017, 18 आणि 19 दरम्यान अनिल पटेल टीम इंडियाचे मॅनेजर राहिले आहेत. पटेल यांच्या काळात टीम इंडियाचा विजयी टक्केवारी ही 100 टक्के इतकी राहिली आहे. टीम इंडियाने अनिल पटेल यांच्या कार्यकाळात 9 मालिका खेळल्या. या 9 मालिकांमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला.
टीम इंडियाने 2021-23 आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलदरम्यान एकूण 18 कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी 10 सामन्यांमध्ये विजय झाला. तर टीम इंडियाला 5 वेळा पराभवाचा सामना करावा लागला. तर 3 सामने हे ड्रॉ राहिले. टीम इंडियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळण्याची सलग दुसरी वेळ आहे. त्याआधी टीम इंडिया 2021 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध भिडली होती. तेव्हा भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.
WTC Final साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड आणि मुकेश कुमार
WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया | पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.