Arjun Tendulkar : सचिनने वर्ल्ड कपला धुतलेल्या ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूचं अर्जुन तेंडुलकरबाबत मोठं वक्तव्य, म्हणाला…

| Updated on: Apr 25, 2023 | 7:57 PM

अर्जुन याने एकूण तीन सामने खेळले आहेत ज्यामध्ये त्याने 2 विकेट्स घेतल्या आहेत. अशातच ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाजाने अर्जुन तेंडुलकरला सल्ला देत मोठं वक्तव्य केलं आहे.

Arjun Tendulkar : सचिनने वर्ल्ड कपला धुतलेल्या ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूचं अर्जुन तेंडुलकरबाबत मोठं वक्तव्य, म्हणाला...
Follow us on

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला आयपीएलमध्ये कधी एकदा खेळण्याची संधी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. अर्जुन याने एकूण तीन सामने खेळले आहेत ज्यामध्ये त्याने 2 विकेट्स घेतल्या आहेत. अशातच ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने अर्जुनला असा सल्ला दिला आहे. त्यासोबतच अर्जुन 140 किमी प्रतितास वेगाने बॉल टाकू शकतो, असा विश्वासही व्यक्त केला आहे.

अर्जुन कोणत्याही टप्प्यात बॉलिंग करू शकतो, तो नवीन चेंडूस्विंग करत आहे. मधल्या षटकांसाठी अर्जुन बॉलिंग करू शकतो. जसजसा खेळेल आणि अनुभव घेईल तसा आणखी परिपक्व होईल. माझा अर्जुनला सल्ला आहे की, टीकाकारांच्या म्हणण्याकडे त्याने लक्ष देऊ नये. वडिलांच्या कारकिर्दीतून शिकावं. बॉलिंगचं त्याच्याकडे अप्रतिम कौशल्य आहे. तो 140 किलोमीटर प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकतो, असं ब्रेट ली याने म्हटलं आहे.

अर्जुनकडे प्रतिभा आणि इतर सर्व काही आहे. त्यामुळे अर्जुन जे करत आहे त्याने ते करत राहावं, असा माझा सल्ला असेल. लोकांनी टीका केली तरी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊ. आता त्याचं वय 23 आहे त्यामुळे त्याला वेग वाढवण्यासाठी अधिक वेळ असल्याचंही ब्रेट लीने सांगितलं.

आयपीएलमधील तीनही सामन्यांदरम्यान अर्जुन सोशल मीडियावर चर्चेत राहिला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 107.2 किमी प्रतितास वेगाने बॉल टाकल्याने त्याच्यावर टीका होताना दिसत आहे. अर्जुन तेंडुलकर याने आयपीएल 2023 मध्ये सनराजयर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात पहिली विकेट घेतली. अर्जुनने भुवनेश्वर कुमार याला आऊट केलं. अर्जुनने यासह सचिन तेंडुलकर याचा विकेट न घेण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. तसेच अर्जुन तेंडुलकर कुंटुबातून आयपीएलमध्ये विकेट घेणारा पहिलाच सदस्य ठरला आहे.