IPL 2023 CSK : सर्वांना वाटलं आता संपलं पण तो…. चेन्नई संघाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!

| Updated on: Apr 21, 2023 | 7:42 PM

चेन्नईच्या ताफ्यामध्ये अशा खेळाडूची एन्ट्री झाली की आहे त्याने एकट्याच्या जोरावर सामने पटलवून दाखवले आहेत. मात्र या खेळाडूच्या मागे दुखापती लागल्याने त्याला आतापर्यंतच्या सामन्यांना मुकावं लागलं होतं.

IPL 2023 CSK : सर्वांना वाटलं आता संपलं पण तो.... चेन्नई संघाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!
Follow us on

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि सनराइजर्स हैदराबाद यांच्यात काही वेळात सामना सुरू होणार आहे. सामन्याआधी सीएसकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. चेन्नईच्या ताफ्यामध्ये अशा खेळाडूची एन्ट्री झाली की आहे त्याने एकट्याच्या जोरावर सामने पटलवून दाखवले आहेत. मात्र या खेळाडूच्या मागे दुखापती लागल्याने त्याला आतापर्यंतच्या सामन्यांना मुकावं लागलं होतं. सुरूवातीला काही सामन्यांमध्ये तो दिसला होता मात्र दुखापत झाल्याने तो संघाच्या बाहेर झाला होता. मात्र आता तो खतरनाक खेळाडू परतल्याने संघासाठी आनंदाची बातमी आहे.

नेमका कोण आहे तो खेळाडू? 

ज्या खेळाडूची चर्चा होत आहे तो खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर बेन स्टोक्स आहे. सीएसकेच्या सराव सत्रात स्टोक्सने सहभाग घेतला होता. बेन स्टोक्सच्या परतण्याने चेन्नई संघाची ताकद आणखी वाढणार आहे.कारण संघाला ज्यावेळी गरज असेल तशा प्रकारे स्टोक्स उपयोगी येऊ शकतो. कारण आपण पाहिले असेल त्याने इंग्लंडला टी-20 आणि वन-डे वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे.

सनाइजर्स हैदराबादविरद्धच्या सामन्यामध्ये कर्णधार धोनीने संघामध्ये कोणताही बदल केला नाही. त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये स्टेक्स काही खेळताना दिसणार नाही. धोनीने आपल्या संघावर विश्वास ठेवत तोच संघ कायम ठेवला आहे. या संघाच्या जोरावर धोनीने आरसीबीचा त्यांनी पराभव केला होता. तसंही धोनी संघात जास्त काही बदल करताना दिसत नाही.

सनराइजर्स हैदराबादविरूद्धच्या सामन्यासाठी चेन्नईचा संघ :

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रुतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, अंबाती रायुडू, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (w/c), महेश थेक्षाना, तुषार देशपांडे, मथीशा पाथिराना

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (C), हेनरिक क्लासेन (W), अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक