मुंबई : आयपीएल स्पर्धेच्या 16 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर झालंय. या मोसमातील सलामीचा सामना हा 31 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गतविजेता गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. या हंगामासाठी 10 संघ तयारीला लागले आहेत. या दरम्यान चेन्नईला मोठा झटका लागला आहे. टीम चेन्नईमधील स्टार ऑलराउंडर या संपूर्ण मोसमात खेळणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
कायले जेमिन्सन दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. त्यानंतर आता चेन्नईला आणखी एक मोठा झटका लागला आहे. इंग्लंडचा ऑलराउंडर बेन स्टोक्स आयपीएल 2023 च्या प्लेऑफमध्ये खेळू शकणार नाहीये. आयर्लंड विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात नेतृत्व करण्यासाठी कॅप्टन स्टोक्स विश्रांती घेणार आहे.
बीसीसीआयने आयपीएलमधील साखळी फेरीतील सामन्याचं वेळापत्रक जाहीर केलंय. पण अजूनही प्लेऑफच्या वेळापत्रकाची प्रतिक्षा आहे. चेन्नई या मोसमातील आपला शेवटचा सामना हा 20 मे रोजी खेळणार आहे. मात्र स्टोक्स साखळी फेरीतील संपूर्ण सामन्यात खेळणार आहे. स्टोक्सने न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीआधीच मी आयर्लंड विरुद्ध खेळणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.
चेन्नई सुपर किंग्सने स्टोक्सला 16 व्या मोसमासाठी 16.25 कोटी मोजले आहेत. दुसरी बाब अशी की फक्त स्टोक्सच नाही, तर ऑस्ट्रेलियाचे अनेक खेळाडू हे आयपीएल प्लेऑफमध्ये खेळू शकणार नाहीत. त्यामुळे चेन्नई प्लेऑफमध्ये खेळू शकतील अशा खेळाडूंचा शोध आहे.
स्टोक्स हा चेन्नईचा महत्वाचा खेळाडू आहे, जो धोनीनंतर कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार आहे. दरम्यान चेन्नई आयपीएलमधील यशस्वी संघापैकी एक आहे. चेन्नई मुंबईनंतर सर्वाधिक 4 ट्रॉफी जिंकणारी टीम आहे.
यंदाच्या 16 व्या मोसमात एकूण 74 साखळी फेरीतील सामने खेळवण्यात येणार आहे. या 74 सामन्यांचं आयोजन हे 12 स्टेडियममध्ये तरण्यात आलं आहे. तसेच 3 वर्षांनी पहिल्यांदा प्रत्येक टीम आपल्या होम ग्राउंडवर खेळणार आहे.
चेन्नई सुपर किंग्स | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेवोन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश तीक्ष्णा, अजिंक्य रहाणे, बेन स्टोक्स, शेख रशीद, निशांत सिंधु, कायल जेमीन्सन, अजय मंडल आणि भगत वर्मा.