मुंबई | चेन्नई सुपर किंग्सला 14 मे रोजी घरच्या मैदानात कोलकाता नाईट रायडर्सकडून 6 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. कोलकाताने चेन्नईवर एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये तब्बल 11 वर्षांनंतर विजय मिळवला. केकेआरने या विजयासह प्लेऑफच्या आशा कायम ठेवल्या. तर पराभवामुळे चेन्नईला मोठा झटका लागला. चेन्नईची या पराभवामुळे प्लेऑफच्या प्रवास कठीण झाला आहे. त्यामुळे आता चेन्नईला दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध होणारा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. त्यामुळे चेन्नईसाठी पुढील प्रवास हा आव्हानात्मक असणार आहे.मात्र त्याआधी चेन्नईला झटका लागेल, अशी बातमी समोर आली आहे.
सीएसकेसाठी वाईट बातमी समोर आली आहे. सीएसकेचा स्टार ऑलराउंडर बाहेर झाला आहे. सीएसकेचा बेन स्टोक्स हा अजूनही अनफीट आहे. त्यामुळे स्टोक्स चेन्नईच्या साखळी फेरीतील अंतिम सामन्यानंतर मायदेशी इंग्लंडला रवाना होणार आहे. चेन्नईचं अजून प्लेऑफ प्रवेश निश्चित नाही. मात्र स्टोक्स प्लेऑफसाठी उपलब्ध नसेल. याबाबतची माहिती इएसपीएएन क्रिकइंफोच्या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.
बेन स्टोक्स आयपीएल 2023 च्या मोसमात आपली छाप सोडण्यात अपयशी सोडला. छाप सोडण्यासाठी तो तेवढा खेळलाच नाही. स्टोक्स अवघ्या 2 सामन्यात खेळला. या 2 सामन्यात स्टोक्सला बॅटिंग आणि बॉलिंगने काहीही करता आलं नाही. त्यानंतर पुढील सामन्यांमध्ये स्टोक्सला दुखापतीमुळे खेळताच आलं नाही. आता स्टोक्सच्या दुखापतीबाबत सीएसके कोच स्टीफन फ्लेमिंग याने माहिती दिली आहे. स्टोक्स आता बॉलिंग करण्यासाठी तयार नाही. मात्र बॅटिंगसाठी ऑप्शन म्हणून तो टीमसाठी उपयोगी पडू शकतो, असं स्टीफन फ्लेमिंग याने स्पष्ट केलं.
चेन्नईने या मोसमात आतापर्यंत एकूण 13 सामने खेळले आहेत. त्यापैकी 7 सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने विजय मिळवला आहे. तर 5 मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर एका सामन्यात पावसाने बॅटिंग केल्याने चेन्नई आणि लखनऊ या दोन्ही संघांना प्रत्येकी 1 पॉइंट देण्यात आला. त्यामुळे चेन्नईचे एकूण 15 पॉइंट्स आहेत. चेन्नई पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश थेक्षानाबेंच, मथेशा पाथीराना, निशांत सिंधू, सुभ्रंश सिंह, अक्षांश सिंह, सेनापती रवींद्र सिंह , ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, सिसांडा मगाला, बेन स्टोक्स, अजय जाधव मंडल, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंग, आरएस हंगरगेकर आणि भगत वर्मा