IPL 2023 | आयपीएलमधून ‘हा’ ऑलराउंडर बाहेर? स्वत: खेळाडूकडून मोठी अपडेट

| Updated on: Mar 01, 2023 | 2:11 AM

आयपीएलच्या 16 व्या पर्वातील पहिला सामना हा गुजरात विरुद्ध चेन्नई यांच्यात खेळवण्यात येणार आहे. हा पहिला सामना 31 मार्च रोजी खेळवला जाणार आहे.

IPL 2023 | आयपीएलमधून हा ऑलराउंडर बाहेर? स्वत: खेळाडूकडून मोठी अपडेट
IPL 2023
Follow us on

मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमाला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या 16 व्या हंगामासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळतेय. मोसमातील सलामीचा सामना हा गतविजेता गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपक किंग्स यांच्यात होणार आहे. मात्र त्याआधी या स्पर्धेला दुखापतीचं ग्रहण लागंलय. स्पर्धेला मोजून 1 महिना असताना आतापर्यंत प्रसिध कृष्णा आणि जसप्रीत बुमराह हे दोघे बाहेर झाले आहेत. त्यात आता चेन्नईचा स्टार ऑलराउंडरने आपल्या फिटनेसबाबत मोठी अपडेट दिली आहे.

इंग्लंडचा कर्णधार आणि आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळणारा बेन स्टोक्सने अपडेट दिली आहे. स्टोक्सला न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत दुखापत झाली होती. त्यामुळे स्टोक्स आयपीएलच्या 16 व्या हंगामातून बाहेर पडणार असल्याचं म्हटलं जात होतं.

स्टोक्स काय बोलला?

स्टोक्सला न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात गुडघ्याची दुखापतीमुळे त्रास जाणवत होता. स्टोक्सला या दुखापतीमुळे सामन्यातील पहिल्या डावात एकही ओव्हर टाकता आली नाही. तर दुसऱ्या डावात त्याने फक्त 2 ओव्हर गोलंदाजी केली. अशात आता स्वत: स्टोक्सने फिटनेसबाबत माहिती दिली आहे. सामन्यानंतर स्टोक्सने ही माहिती दिली. “मी आगामी आयपीएल स्पर्धेत खेळणार आहे. मी चेन्नईचे कोच स्टीफन फ्लेमिंग यांच्या संपर्कात आहे. माझ्या तब्येतीबाबत त्यांना सर्व माहिती आहे. एशेज सीरिजआधी आमच्याकडे 3-4 महिन्यांचा वेळ आहे. आम्ही आमच्या वैद्यकीय पथकासह फार मेहनत घेतली. जेणेकरुन सर्वकाही ठीक होईल”, असं स्टोक्सने नमूद केलं.

हे सुद्धा वाचा

आयपीएलमधील यशस्वी टीम

दरम्यान चेन्नई आयपीएलमधील दुसरी यशस्वी टीम आहे. चेन्नईने 4 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. चेन्नईने 2010, 2011, 2018 आणि 2021 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.

आयपीएल 2023 साठी टीम सीएसके

महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.