मुंबई | आयपीएल स्पर्धेच्या 16 व्या मोसमासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी आता थोडासा अवधी उरला आहे. सर्व संघांनी सरावाला सुरुवात केली आहे. एका कपसाठी जवळपास दीड महिने हा थरार रंगणार आहे. स्पर्धेला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. मोसमातील सलामीचा सामना हा गतविजेत्या गुजरात जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या आधी सोशल मीडियावर एका पोस्टमुळे एकच चर्चा रंगली आहे. या पोस्टमुळे क्रिकेट चाहत्यांना धोनी नव्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
हा व्हीडिओ चेन्नई सुपर किंग्सच्या अधिकृत अकाउंटवरुन शेअर करण्यात आलाय. या व्हीडिओत ‘कॅप्टन कूल’ धोनी बॅटिंग आणि बॉलिंगचा सराव करताना दिसतोय. त्यामुळे धोनी या पर्वात बॉलरची भूमिकाही बजावणार की काय, असा सवाल क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.
हा व्हीडिओ भन्नाट पद्धतीने एडीट करण्यात आला आहे. या व्हीडिओमध्ये एका बाजूला धोनी बॉलिंगची एक्शन करुन बॉल टाकतो तर दुसऱ्याच बाजूला धोनी बॅटिंगसुद्धा करतोय. हा व्हीडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीला पडला आहे. त्यामुळे आता धोनी बॉलरच्या भूमिकेत दिसणार का, या प्रश्नाचं उत्तरासाठी 31 मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
महेंद्रसिंह धोनी याचा सराव
धोनी हा आयपीएलमधील यशस्वी कर्णधार आहे. धोनीने आपल्या नेतृत्वात टीमला 4 वेळा चॅम्पियन केलं आहे. धोनीने चेन्नईला 2010, 2011, 2018 आणि 2021 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे.
धोनीने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 234 सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 4 हजार 978 धावा केल्या आहेत. यात 24 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच धोनीने 229 गगनचुंबी सिक्स ठोकले आहेत.
महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड़, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.