MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी आला अन् चेपॉकमध्ये उडवलं हेलिकॉप्टर, माहीची झलक पाहिलीत का?

| Updated on: May 11, 2023 | 12:44 AM

सीएसके संघाच्या विकेट पडत गेल्यावर माहीने त्याला उत्तम फिनशर का म्हणतात हे परत एकदा दाखवून दिलं आहे. धोनीची छोटीशी पण एकदम दमदार खेळी पाहिली नसेल तर पाहा.

MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी आला अन् चेपॉकमध्ये उडवलं हेलिकॉप्टर, माहीची झलक पाहिलीत का?
Follow us on

मुंबई : सीएसके आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये कॅपिटल्स संघाचा 27 धावांनी पराभव झालेला आहे. दिल्ली संघाची सुमार कामगिरी यंदाच्या पर्वामध्ये पाहायला मिळाली. तर दुसरीकडे लाखो लोकांचा हिरो असलेल्या महेंद्रसिंह धोनी याने चाहत्यांना खूश केलं. सीएसके संघाच्या विकेट पडत गेल्यावर माहीने त्याला उत्तम फिनशर का म्हणतात हे परत एकदा दाखवून दिलं आहे.

महेंद्र सिंह धोनी याने  222 च्या स्ट्राईक रेटने 9 बॉलमध्ये 20 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 2 षटकार आणि 1 चौकार मारला. सतराव्या ओव्हरमध्ये अम्बाती रायडू बाद झाल्यावर स्टेडिअममध्ये धोनी धोनी आवाज ऐकू येत होता. धोनी फक्त मैदानात येताना इतका जल्लोष असतो मग विचार करा त्याने दोन सिक्स आणि 1 फोर मारल्यावर चाहत्यांना किती आनंद होत असेल.

पाहा व्हिडीओ-

 

सामन्याचा धावता आढावा 

चेन्नई सुपर किंग्सने दिलेलं 168 धावांचं आव्हान दिल्लीला पेललं नाही. सुरुवातीपासून चेन्नईचे गोलंदाज दिल्लीच्या फलंदाजांवर हावी झाले. पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरच डेविड वॉर्नर बाद झाला. त्यानंतर फलंदाजांना कमबॅक करण्यास गोलंदाजांनी संधीच दिली नाही.

एखाद दोन षटकार मारले पण निर्धाव चेंडूमुळे विजयी धावांचं अंतर वाढतच गेलं. यामुळे दिल्लीला पुन्हा एकदा पराभवाचं तोंड पाहावं लागलं. चेन्नईने या विजयासह प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे. 15 गुणांसह गुणतालिकेत दुसरं स्थान कायम ठेवलं आहे. त्यामुळे आता उर्वरित दोन सामन्यापैकी एका सामन्यात विजय मिळवून थेट प्लेऑफमध्ये स्थान मिळणार आहे.

चेन्नई सुपर किंग्स : डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोइन अली, रवींद्र जडेजा, एम एस धोनी (कर्णधार/विकेटकीपर), शिवम दुबे, तुषार देशपांडे, दीपक चाहर, महेश तीक्षणा, मथीशा पथिराना, अजिंक्य रहाणे

दिल्ली कॅपिटल्स : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मनिष पांडे, रिले रोस्सो, प्रियम गर्ग, अक्षर पटेल, रिपल पटेल, कुलदीप यादव, मिशेल मार्श, ईशांत शर्मा, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), अमन हाकिम खान