तामिळनाडू | आयपीएल 16 व्या मोसमात रविवारी 14 मे रोजी डबल हेडर खेळवण्यात येणार आहे. या डबल हेडरमधील दुसऱ्या आणि मोसमातील 61 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने असणार आहेत. कोलकाता नाईट रायडर्सचं नेतृत्व नितीश राणा याच्याकडे असणार आहे. तर चेन्नई सुपर किंग्सची धुरा ही महेंद्र सिंह धोनी याच्याकडे असेल. विशेष बाब म्हणजे एम ए चिदंबरम स्टेडियमवर सीएसकेची हा मोसमातील शेवटचा सामना असणार आहे. धोनीचा हा अखेरचा आयपीएल सिजन असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे घरच्या मैदानात धोनीला पाहण्यासाठी अनेक चाहते उपस्थित राहतील. या सामन्यात विजय मिळवून प्लेऑफमधील स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न चेन्नईचा असणार आहे.
तर प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सचा उर्वरित सर्व सामने जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र चेन्नईला चेपॉक स्टेडियममध्ये पराभूत करायंच म्हणजे आव्हानात्मक आहे. या सामन्यासाठी तुमच्या ड्रीम इलेव्हनमध्ये कोणते खेळाडू हवेत, हे जाणून घ्या.
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या सामन्याला रविवारी 14 मे रोजी संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
चेन्नईतील एमए चिदंबरम (चेपॉक) स्टेडियम इथे या सामन्याचं आयोजन केलं गेलं आहे.
सीएसके विरुद्ध केकेआर यांच्यातील सामना मोबाईल आणि लॅपटॉपवर जिओ सिनेमाच्या माध्यमातून पाहता येईल. एकूण 12 भाषांमध्ये कॉमेंट्री ऐकता येणार आहे.
स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेलवर चेन्नई विरुद्ध केकेआर मॅच पाहता येईल.
कॅप्टन – डेव्हॉन कॉनवे
उपकर्णधार- रविंद्र जडेजा
बॅट्समन – ऋतुराज गायकवाड रिंकू सिंह, डेव्हॉन कॉन्वे आणि शिवम दुबे.
ऑलराउंडर – आंद्रे रसेल, मोईन अली आणि रविंद्र जडेजा
बॉलर – महेश तीक्ष्णा, वरुण चक्रवर्ती आणि मथीशा पथिराना
विकेटकीपर- महेंद्रसिंह धोनी
चेपॉक स्टेडियममध्ये टॉस जिंकून बहुतांश संघाचा पहिले फिल्डिंग करण्याकडे सर्वाधिक कळ असतो. तर पहिले बॅटिंग करुन प्रतिस्पर्धी संघासमोर मजबूत आव्हान ठेवून दबाव निर्माण करता येऊ शकतो. चेन्नईची खेळपट्टी ही केकेआरकडून चमकदार कामगिरी करत असलेल्या वरुण चक्रवर्थी आणि सुनील नारायण यांच्यासाठी मदतशीर ठरु शकते. त्यामुळे फलंदाजांना या खेळपट्टीवर जरा जपूणच खेळावं लागणार आहे.
कोलकाता नाइट रायडर्स | नितीश राणा (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, वैभव अरोडा, हर्षित राणा, सुयश शर्मा आणि वरुण चक्रवर्ती.
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉन्वे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायडू, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, दीपक चाहर, तुषार देशपांडे आणि महेश तीक्ष्णा.