तामिळनाडू | आयपीएल 16 व्या मोसमातील सहाव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध 12 धावांची खेळी केली. धोनीने सलग 2 बॉलमध्ये 2 खणखणीत सिक्स मारले. धोनीच्या या फटकेबाजीनंतर लखनऊ सुपर जायंट्सच्या डगआऊटमध्ये असलेला कोचिंग स्टाफमधील गौतम गंभीर याची रिएक्शन सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. गंभीर धोनीवर सातत्याने टीका करत असतो. वर्ल्ड कप 2011 चं क्रेडिट न मिळाल्याने गंभीर हा कायम धोनीवर टीका करत असतो. आता धोनीच्या या 2 सिक्समुळे गंभीरचा चेहरा हा पाहण्यासारखा झाला आहे.
धोनीने 20 व्या ओव्हरमध्ये मार्क वूडच्या बॉलिंगवर दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर 2 कडक सिक्स खेचले. त्यामुळे डगआऊटमधील गौतम गंभीर याच्या चेहऱ्यावर आठ्या पाहायला मिळाल्या. मात्र चौथ्या बॉलवर आऊट झाल्याने गंभीरने आणि बॉलर मार्क वूड या दोघांनी सुटकेचा निश्वास घेतला.
दरम्यान धोनीने 12 धावांच्या खेळीसह मानाच्या पंक्तीत स्थान मिळवलंय. धोनी आयपीएलमध्ये 5 हजार धावा करणारा एकूण 7 वा तर 5 वा भारतीय फलंदाज ठरला आहे. धोनीच्या नावावर आता 5 हजार 4 धावांची नोंद आहे.
धोनीच्या फटेबाजीनंतर गंभीरची रिएक्शन व्हायरल
Why always ms Dhoni's sixes are the reason for Gautam Gambhir sadness??
Holddddd ??#IPL2023 #CSKvLSG #MsDhoni pic.twitter.com/crTAean3mv
— Mr.ᴠɪʟʟᴀ (@AchajiOk) April 3, 2023
विराट कोहली – 6 हजार 706 धावा
शिखर धवन – 6 हजार 284 धावा
डेव्हिड वॉर्नर – 5 हजार 937 धावा
रोहित शर्मा – 5 हजार 880 धावा
सुरेश रैना – 5 हजार 528 धावा
ए बी डीव्हीलियर्स – 5 हजार 162 धावा
महेंद्रसिंह धोनी – 5 हजार 4 धावा
चेन्नई सुपरकिंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन) डेवन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, बेन स्टोक्स, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, दीपक चाहर, मिचेल सँटनर आणि राजवर्धन हंगरगेकर.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | केएल राहुल (कर्णधार), कायल मायर्स, निकोलस पूरन, मार्कस स्टोयनिस, दीपक हुड्डा, क्रुणाल पंड्या, आयुष बडोनी, मार्क वूड, यश ठाकूर, रवी बिश्नोई आणि आवेश खान.