तामिळनाडू | आयपीएलच्या 16 व्या मोसमातील सहाव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने लखनऊ सुपर जायंट्सवर 12 धावांनी मात करत पहिलावहिला विजय साजरा केला आहे. चेन्नईने लखनऊला विजयासाठी 218 धावांचे आव्हान दिले होते. मात्र लखनऊला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 205 धावाच करता आल्या. चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने केलेल्या 12 धावा या निर्णायक ठरल्या. धोनीच्या 12 धावांनी सामन्याला कलाटणी दिली.
दरम्यान त्याआधी लखनऊने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. चेन्नईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 217 धावा केल्या. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड याने सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. तर डेव्हॉन कॉनवे याने 47 रन्संचं योगदान दिलं. ऋतुराज आणि डेव्हॉन या दोघांनी 110 धावांची सलामी भागीदारी केली.
ऋतुराज या डेव्हॉन या व्यतिरिक्त शिवम दुबे आणि अंबाती रायुडू या दोघांनी प्रत्येकी 27 धावांचं योगदान दिलं. मोईन अली 19 रन्सवर आऊट झाला. धोनीने 2 बॉलमध्ये 2 सिक्स मारुन 12 धावा केल्या. धोनीने यासह विक्रम केला. तर बेन स्टोक्स याने 8, रविंद्र जडेजा याने 3 आणि मिचेल सँटनरने 1* धाव केली. तर लखनऊकडून रवी बिश्नोई आणि मार्क वूड या दोघांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर आवेश खान याने 1 विकेट घेतली.
चेन्नई सुपरकिंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन) डेवन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, बेन स्टोक्स, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, दीपक चाहर, मिचेल सँटनर आणि राजवर्धन हंगरगेकर.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | केएल राहुल (कर्णधार), कायल मायर्स, निकोलस पूरन, मार्कस स्टोयनिस, दीपक हुड्डा, क्रुणाल पंड्या, आयुष बडोनी, मार्क वूड, यश ठाकूर, रवी बिश्नोई आणि आवेश खान.