Mahendra Singh Dhoni | महेंद्रसिंह धोनी याने विजयानंतर कुणाला मिठी मारली? फोटो व्हायरल

| Updated on: Apr 04, 2023 | 2:19 AM

महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने लखनऊ सुपर जायंट्सवर 12 धावांनी विजय मिळवला. धोनीने या विजयानंतर नक्की कुणाला मिठी मारली? जाणून घ्या

Mahendra Singh Dhoni | महेंद्रसिंह धोनी याने विजयानंतर कुणाला मिठी मारली? फोटो व्हायरल
Follow us on

तामिळनाडू | आयपीएल 16 व्या हंगामातील सहावा सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. अनेक वर्षांनंतर चेन्नई आपल्या होम ग्राउंमध्ये खेळत होती. आपल्या लाडक्या कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला पाहण्याासाठी क्रिकेट चाहत्यांनी दुप्पट तिप्पट दराने तिकीट खरेदी करुन सामना पाहण्यासाठी आले. धोनीनेही आपल्या चाहत्यांचा हिरमोड केला नाही. धोनीनेही पैसवसूल कामगिरी करत चाहत्यांना विजयी गिफ्ट दिलं. चेन्नईने लखनऊला विजयासाठी 218 धावांचं आव्हान दिलं. धोनीने शेवटच्या 20 व्या ओव्हरमध्ये सलग 2 बॉलवर 2 सिक्स मारले.

धोनीचे शेवटच्या 20 ओव्हरमधील हे 2 सिक्स गेमेचेंजर ठरले. लखनऊला चेन्नईने दिलेले 218 धावांचं आव्हान पेलवता आलं नाही. लखनऊने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 205 धावाच केल्या. चेन्नईचा 12 धावांनी विजय झाला. धोनीने केलेल्या 12 धावा या लखनऊला महागात पडल्या . याच धावांनी सामना फिरवला. चेन्नईचा हा या मोसमातील दुसरा सामना आणि पहिला विजय ठरला. चेन्नईला पहिल्या सामन्यात गतविजेत्या गुजरातकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

हे सुद्धा वाचा

दरम्यान चेन्नईने विजयानंतर जंगी सेलिब्रेशन केलं. मात्र धोनीने विजयानंतर केलेली एक कृती ही ट्विटरवर ट्रेंड झाली आहे. धोनीने त्याची पत्नी साक्षी पेक्षा जवळच्या असलेल्या त्या व्यक्तीला भर मैदानात घट्ट मिठी मारली. धोनीचा त्या व्यक्तिला मिठी मारल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

धोनीने दुसऱ्या तिसऱ्या कुणाला नाही, तर चेन्नईचा माजी ऑलराउंडर खेळाडू सुरेश रैना याला कडाडून मिठी मारली. रैना या मैदानात हजर होता. चेन्नईच्या विजयानंतर रैना आणि धोनीने एकमेकांना घट्ट मिठी मारली. धोनी आणि रैनाची केमिस्ट्री ही सर्वांनाच माहिती आहे.

दोघेही टीम इंडियासाठी खेळले. दोघांनी एकामागोमाग अशी निवृत्ती घेतली. दोघेही एकमेकांच्या जवळचे आहेत. धोनीच्या आयुष्यात साक्षी पत्नी म्हणून नंतर आली. मात्र त्याआधी धोनी आणि रैना हे दोघे एकमेकांच्या जवळचे आहेत. दोघांमध्ये याराना आहे. हाच याराना या घट्ट मिठीतून दिसून येत आहे.

धोनी रैना यांची गळाभेट 

रैना आणि धोनी या दोघांच्या मिठीचा फोटो चेन्नई सुपर किंग्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन पोस्ट केला आहे. या फोटोला आतापर्यंत हजारोत लाईक मिळाले आहेत. तसेच सीएसकेकडून आणखी एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोत रैनासोबत त्याचे चेन्नई टीममधील सहकारी आहेत. या फोटोत डाव्या बाजूने रॉबिन उथप्पा, महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना, रविंद्र जडेजा आणि अंबाती रायुडू दिसून येत आहे.