तामिळनाडू | आयपीएल 16 व्या मोसमात शनिवार 6 मे रोजी डबल हेडरचा थरार रंगणार आहे. या डबल हेडरमधील पहिलाच सामना हा हायव्होल्टेज असणार आहे. या 16 व्या सिजनमधील 49 वा सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने असणार आहेत. या सामन्याचं आयोजन हे एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या दोन्ही संघांची या पर्वात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. चेन्नईने मुंबईचा गेल्या सामन्यात होम ग्राउंड वानखेडे स्टेडियममध्ये पराभव केला होता. त्यामुळे मुंबईला चेन्नईवर मात करत मागील पराभवाचा वचपा घेण्याची संधी आहे. दरम्यान त्याआधी आपण या दोन्ही संघांचा इतिहास जाणून घेणार आहोत.
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे आयपीएल इतिहासातील यशस्वी संघ आहेत. मुंबईने एकूण 5 तर चेन्नईने 4 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. हे दोन्ही संघांचा आयपीएल इतिहासात एकूण 35 वेळा आमनासामना झाला आहे. यामध्ये मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्सवर वरचढ राहिली आहे.
मुंबईने चेन्नईला 35 पैकी 20 सामन्यात पराभूत केलंय. तर चेन्नईने 15 मॅचमध्ये मुंबईवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आकड्यांनुसार मुंबई चेन्नईवर वरचढ आहे. त्यामुळे आता शनिवारच्या सामन्यात चेन्नई पुन्हा एकदा बाजी मारणार, की मुंबई मागील पराभवाचा वचपा घेणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
चेन्नई सुपर किंग्स टीम | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.
मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कर्णधार), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, जोफ्रा आर्चर आणि संदीप वॉरियर.