CSK vs MI | चेन्नईला मुंबई इंडियन्स विरुद्धच्या विजयापेक्षा ही गोष्ट कायम लक्षात राहील, धोनी तर कधीच विसरणार नाही

| Updated on: May 06, 2023 | 7:58 PM

चेन्नई सुपर किंग्सच्या विजयापेक्षा मुंबई इंडियन्सच्या पराभवाची चर्चा जास्त रंगली आहे. चेन्नई हा विजय आयपीएलच्या इतिहासात कधीच विसरणार नाही. असं नक्की काय झालं?

CSK vs MI | चेन्नईला मुंबई इंडियन्स विरुद्धच्या विजयापेक्षा ही गोष्ट कायम लक्षात राहील, धोनी तर कधीच विसरणार नाही
Follow us on

तामिळनाडू | आयपीएल 16 व्या मोसमात चेन्नई सुपर किंग्स टीमने मुंबई इंडियन्सवर सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने पहिले बॅटिंग करताना चेन्नई सुपर किंग्ससमोर 140 धावांचं आव्हान ठेवलं होतं. चेन्नईने हे आव्हान आरामात 17.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मुंबईने गेल्या 2 सामन्यात राजस्थान आणि पंजाब विरुद्ध 200 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करुन सामना जिंकला होता. मात्र या सामन्यात कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं आणि तिथेच चेन्नईचा विजय निश्चित केला. चेन्नई सुपर किंग्स टीमसाठी आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनी आजचा दिवस अजिबात विसरणार नाही.

हा सामना चेन्नईच्या होम ग्राउंड अर्थात एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. मात्र इथे मुंबईचाच गेल्या 13 वर्षांपासून दबदबा आणि धमाका पाहायला मिळत होता. मुंबई गेल्या 13 वर्षांपासून इथे चेपॉक स्टेडियमवर चेन्नई विरुद्ध सामने जिंकत होती. मात्र अखेर चेन्नईने मुंबईची ही मक्तेदारी मोडून काढली. चेन्नईने मुंबईवर विजय मिळवत या 13 वर्षांच्या पराभवाच्या मालिकेला ब्रेक लावला. त्यामुळे चेन्नई हा विजय कधीही विसरणार नाही.

चेन्नईच्या फलंदाजांनी मुंबईने दिलेल्या आव्हानाचं पाठलाग करताना शानदार योगदान दिलं. चेन्नईकडून डेव्हॉन कॉनव्हे याने सर्वाधिक 44 धावांची खेळी केली. ऋतुराज गायकवाड याने 30 रन्सचं योगदान दिलं. अजिंक्य रहाणे याने 21 तर अंबाती रायुडू याने 12 धावा केल्या. तर शिवम दुबे आणि कॅप्टन महेंद्रसिंह धोनी या जोडीने चेन्नईला विजयी केलं. शिवम दुबे याने नाबाद 26 धावा केल्या. तर धोनीने विजयी धाव काढत नेहमीप्रमाणे फिनिशिंग टच दिला. धोनी 2 धावांवर नाबाद राहिला. मुंबईकडून पियूष चावला याने 2 फलंदाजांना माघारी पाठवलं. तर ट्रिस्टन स्टबस आणि आकाश मधवाल या दोघांनी 1-1 विकेट घेतली.

दरम्यान त्याआधी चेन्नईने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईला चेन्नईच्या भेदक माऱ्यासमोर 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 139 धावाच करता आल्या. मुंबईचे टॉप ऑर्डरमधील फलंदाज अपयशी ठरले. इशान किशन 7, कॅमरुन ग्रीन 6 आणि रोहित शर्मा भोपळा न फोडताच माघारी परतला. त्यानंतर नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव आणि ट्रिस्टन स्ट्रब्स या तिकडीने मुंबईची लाज राखली. या तिघांनी अनुक्रमे 64, 26 आणि 20 धावांची खेळी केली. तर टीम डेव्हिड आणि अर्शद खान या दोघांनी 2 आणि 1 असा स्कोअर केला. तर जोफ्रा आर्चर याने 3 आणि पीयूष चावला 2 नाबाद धावा केल्या.

चेन्नईकडून महेश पथीराना याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. दीपक चाहर आणि तुषार देशपांडे या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर रविंद्र जडेजा याने 1 विकेट घेत इतर गोलंदाजांना चांगली साथ दिली.

चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे आणि महेश थीक्षाना.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, ट्रिस्टन स्टब्स, टिम डेव्हिड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, आकाश मधवाल आणि अर्शद खान.