तामिळनाडू | आयपीएल 16 व्या सिजनमधील रायव्हलरी वीकला आजपासून (6 मे) सुरुवात होत आहे. या रायव्हलरी वीकमध्ये आज डबल हेडरचा थरार रंगणार आहे. या डबल हेडरमधील पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या 2 चॅम्पियन टीममध्ये खेळवण्यात येत आहे. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने टॉस जिंकून मुंबई इंडियन्सला बॅटिंगसाठी भाग पाडलंय.चेन्नई विरुद्ध मुंबई या दोन्ही संघांची या मोसमातील आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. चेन्नईने या पहिल्या सामन्यात मुंबईवर घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये पराभव केला होता. त्यामुळे मुंबईचा या सामन्यात चेन्नईवर मात करुन मागील पराभवाचा वचपा घेण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र त्याआधी मुंबई इंडियन्सला मोठा झटका लागला आहे.
चेन्नई विरुद्धच्या या प्रतिष्ठेच्या सामन्यातून मुंबईचा स्टार आणि मॅचविनर बॅट्समन तिळक वर्मा हा बाहेर झाला आहे. तिळक वर्मा याला दुखापतीमुळे प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडावं लागलं आहे. कॅप्टन रोहित शर्मा याने टॉसदरम्यान ही माहिती दिली. तिळक वर्मा याने मुंबईसाठी या मोसमात निर्णायक क्षणी मोठी खेळी साकारली आहे. तसेच काही वेळा विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका साकारली आहे.
तिळक वर्मा याने आतापर्यंत या मोसमात एकूण 9 सामन्यांमध्ये 158.38 स्ट्राईक रेट आणि 45.67 च्या एव्हरेजने 274 धावा केल्या आहेत. तिळकने यात एक अर्धशतक ठोकलंय. तिळकची 84 ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.
चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या या प्रतिष्ठेच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने 2 महत्वाचे आणि मोठे बदल केले आहेत. कुमार कार्तिकेय हा बाहेर झाला आहे. त्याच्या जागी राघव गोयल याला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. तर तिळक वर्मा याला दुखापत झाल्याने तो प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी ट्रिस्टन स्टब्स याला संधी देण्यात आली आहे.
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे आणि महेश थीक्षाना.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, ट्रिस्टन स्टब्स, टिम डेव्हिड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, आकाश मधवाल आणि अर्शद खान.