M S Dhoni | महेंद्रसिंह धोनी याचा पंजाब किंग्स विरुद्ध तडाखा, 2 सिक्स ठोकत धमाका

| Updated on: Apr 30, 2023 | 6:21 PM

चेन्नई सुपर किंग्स टीमचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्यासोबत पंगा घेणं पाहणाऱ्या सॅम करन याला चांगलंच महागात पडलंय. धोनीने शेवटच्या 2 बॉलवर कडक सिक्स ठोकले.

M S Dhoni | महेंद्रसिंह धोनी याचा पंजाब किंग्स विरुद्ध तडाखा, 2 सिक्स ठोकत धमाका
Follow us on

चेन्नई | आयपीएल 16 व्या सिजनमधील 41 वा सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने घरच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. चेन्नईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून राउंड फिगर 200 धावा केल्या. त्यामुळे पंजाब किंग्सला विजयासाठी 201 धावांचे आव्हान मिळाले. चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवे याने सर्वाधिक नाबाद 92 धावांची खेळी केली. कॉनवेने या 52 चेंडूच्या खेळीत 16 सिक्स आणि 1 चौकार ठोकला. ऋतुराज गायकवाड याने 37 रन्स केल्या. यासाठी ऋतुराजने 31 बॉलचा सामना करता 4 चौकार आणि 1 सिक्स ठोकला.

शिवम दुबे याने 17 बॉलमध्ये 28 धावा केल्या. मोईन अली 10 धावा करुन माघारी परतला. तर रविंद्र जडेजा याने 10 चेंडूत 12 धावांची खेळी साकारली. हा सामना होम ग्राउंडमध्ये होत असल्याने क्रिकेट चाहते धोनीची बॅटिंग पाहण्यासाठी उत्साही होते. धोनी बॅटिंगसाठी मैदानात केव्हा येतो, यासाठी चाहते टीव्ही स्क्रीनकडे डोळे लावून बसले होते. मात्र रविंद्र जडेजा आऊट झाला आणि अखेर धोनी मैदानात आलाच. धोनी मैदानात आला तेव्हा चेन्नईची 19.1 ओव्हरमध्ये 185 बाद 4 अशी स्थिती होती. धोनीकडे फक्त 5 बॉल होते.

क्रिकेट चाहत्यांना धोनीकडून धमाक्याची अपेक्षा होती. धोनीने आपल्या चाहत्यांना नाराज केलं नाही. धोनीने या 20 ओव्हरच्या पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर सलग 2 कडक सिक्स ठोकले. धोनीने या ठोकलेल्या 2 सिक्समुळे चेन्नईला कट टु कट 200 धावा पूर्ण करता आल्या. धोनीने पंजाब विरुद्ध 4 बॉलमध्ये 2 सिक्सच्या मदतीने नाबाद 13 धावा केल्या. धोनीने यासह त्याला डोळे दाखवणाऱ्या सर्वात महागड्या सॅम करन याला 18 सेकंदात जागा दाखवून दिली.

धोनीचे कडक सिक्स

धोनीच्या धावा निर्णायक ठरणार?

दरम्यान धोनीने 3 एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध अखेरच्या ओव्हरमध्ये येऊन 2 सिक्स ठोकले होते. चेन्नईने हा सामना 12 धावांनी जिंकल्या होत्या. लखनऊच्या पराभवाला धोनीचे हे 2 सिक्स कारणीभूत ठरले होते. त्यामुळे आता पंजाबला धोनीने ठोकलेले 2 सिक्स महागत पडणार का, हे सामन्याच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे आणि महेश थीषाना.

पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | शिखर धवन (कर्णधार), अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन, सिकंदर रझा, सॅम करन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग