चेन्नई | आयपीएल 16 व्या हंगामात रविवारी 30 एप्रिल रोजी डबल हेडर सामन्यांचं आयोजन करण्यात आलंय. या डबल हेडरमधील पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्सने शेवटच्या बॉलवर 3 धावा पूर्ण करुन 4 विकेट्सने थरारक विजय मिळवला.चेन्नईने पंजाबला विजयासाठी 201 धावांचं आव्हान दिलं होतं. पंजाबने हे आव्हान शेवटच्या बॉलवर पूर्ण करुन चेन्नईला पाणी पाजलं. पंजाबने यासह गेल्या 15 वर्षात कोणत्याही टीमला न जमलेली कामगिरी करुन दाखवली आहे.
पंजाब चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 200 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करुन जिंकणारी पहिलीच टीम ठरली आहे. याआधी कोणत्याही टीमला चेन्नई विरुद्ध त्यांच्याच होम ग्राउंडमध्ये 200 पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करता आला नव्हत. पंजाबचा सिंकदर रजा या हा विजयाचा हिरो ठरला. पंजाबला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर 3 धावा हव्या होत्या.
शेवटच्या चेंडूचा थरार
Sikandar Raza, you little beauty. ❤️
Moments like these make our beloved game so very very special.pic.twitter.com/kkinebat8V
— North Stand Gang – Wankhede (@NorthStandGang) April 30, 2023
त्यावेळेस सिंकदर रजा याने धावून 3 धावा पूर्ण केल्या. घरच्या मैदानात पराभव झाल्याने चेन्नई चाहत्यांचा हिरमोड झालेला दिसून आला. इतकंच काय, तर चेन्नई कॅप्टन महेंद्रसिंह धोनी याचाही चेहरा पडलेला दिसून आला. त्यामुळे चाहतेही भावूक झालेले दिसून आले.
पंजाबकडून कोणत्याही एका फलंदाजाने मोठी नाही, मात्र उपयुक्त खेळी करत आपली भूमिका चोखपणे पार पाडली. पंजाबकडून प्रभासिमरन सिंह याने सर्वाधिक 42 धावा केल्या. कॅप्टन शिखर धवन याने 28 रन्स जोडल्या. अथर्व तायडे याने 13 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. लियाम लिविंगस्टोन याला तुषार देशपांडे याने 40 धावावर बाद केलं. सॅम करनने 29 रन्स केल्या. जितेश शर्मा याने 21 धावा केल्या. तर शाहरुख खान आणि सिंकदर रजा ही जोडी पंजाबच्या विजयाची शिल्पकार ठरली. शाहरुख आणि सिंकदर या दोघांनी अनुक्रमे नाबाद 2 आणि 13 धावा केल्या.
तर चेन्नईकडून तुषार देशपांडे याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. रविंद्र जडेजा याने 2 आणि मथीशा पथिराणा याने 1 विकेट घेतली.
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे आणि महेश थीषाना.
पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | शिखर धवन (कर्णधार), अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन, सिकंदर रझा, सॅम करन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग