IPL 2023 CSK vs RR : राजस्थान विरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीकडून नको तेच घडलं, यशस्वी जयस्वालनं भाग पाडलं! Watch Video

| Updated on: Apr 27, 2023 | 9:57 PM

IPL 2023 : महेंद्रसिंह धोनी आयपीएल स्पर्धेतील सर्वात वयस्कर कर्णधार आहे. त्याचा अनुभव चेन्नई सुपर किंग्ससाठी कायमच फायद्याचा ठरला आहे. कारण धोनी प्रत्येक निर्णय चपळाईने घेतो. पण राजस्थान विरुद्धच्या सामन्यात नको तेच घडलं.

IPL 2023 CSK vs RR : राजस्थान विरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीकडून नको तेच घडलं, यशस्वी जयस्वालनं भाग पाडलं! Watch Video
IPL 2023 CSK vs RR Video: महेंद्रसिंह धोनीकडून अखेर ती चूक घडलीच, यशस्वी जयस्वालच्या खेळीमुळे घ्यावा लागला नको तो निर्णय
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

मुंबई : क्रिकेट खेळताना प्रत्येक गोष्टींकडे बारीक नजर असणं आवश्यक आहे. कारण मैदानातील प्रत्येक क्षण सामना फिरवत असतो. महेंद्रसिंह धोनी यात तरबेज आहे. महेंद्रसिंह धोनीचे जवळपास सर्वच निर्णय पंचाच्या अंगाशी आल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे डीआरएस सिस्टमला धोनी रिव्ह्यू सिस्टम असं म्हंटलं जातं. पण राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात वेगळंच चित्र पाहायला मिळालं. महेंद्रसिंह धोनीने घेतलेला निर्णय चुकला आणि सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं. यासाठी यशस्वी जयस्वालची आक्रमक खेळी जबाबदार असल्याचं बोललं जात आहे.

राजस्थानची प्रथम फलंदाजी सुरु असताना महेंद्रसिंह धोनीने चौथं षटक महीश तीक्षणाला सोपवलं. चौथ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटला लागण्याऐवजी पॅडला लागला आणि पंचांकडे अपील केली. पण पंचानी नाबाद दिलं. त्यानंतर धोनी रिव्ह्यू घेतला.

धोनीकडून डीआरएस घेताना चूक

महेंद्रसिंह धोनी आणि डीआरएस यांचं एक वेगळंच नातं आहे. महेंद्रसिंह धोनी जेव्हा रिव्ह्यू घेतो तेव्हा फलंदाज आऊटच असतो असं गृहीत धरलं जातं. पण रिव्ह्यूमध्ये यशस्वी जयस्वाल नाबाद असल्याचं दिसून आलं. कारण चेंडू लेग स्टंपवर पडला होता. यशस्वी जयस्वालच्या आक्रमक खेळीमुळे धोनीला असा निर्णय घ्यावा लागल्याचं चर्चा रंगली आहे.

यशस्वी जयस्वालने मैदानात उतरताच आक्रमक फटकेबाजी सुरु केली. एका षटकात तीन चौकार ठोकले. तसेच 26 चेंडूत अर्धशतक केलं. जयस्वालच्या हिटिंगमुळे चेन्नईच्या गोलंदाजांची त्रेधातिरपीट उडाली होती. त्यामुळे यशस्वीला बाद करणं गरजेचं आहे हे लक्षात घेऊन धोनीने डीआरएस घेतला.

यशस्वी जयस्वालची चेन्नई विरुद्ध चांगला रेकॉर्ड राहिला आहे. डावखुऱ्या यशस्वीने आयपीएलमध्ये 6 अर्धशतकं ठोकली आहेत. यात तीन अर्धशतकं चेन्नई विरुद्ध आहेत. चेन्नईविरुद्ध पहिलं अर्धशतक त्याने 2021 मध्ये 21 चेंडूत ठोकलं होतं.

दोन्ही संघाचे खेळाडू

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेवन): यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सैमसन (w/c), शिमरोन हेटमेयर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, एडम ज़म्पा, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल

चेन्नई सुपर किंग्स (प्लेइंग इलेवन): ऋुतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोइन अली, अंबाती रायडू, शिवम दूबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कप्तान/कप्तान), मथीशा पथिराना, तुषार देशपांडे, महेश तीक्ष्णा