मुंबई : आयपीएलचा 17 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्समध्ये सुरू आहे. या सामन्यामध्ये सीएसकेने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राजस्थानने पहिल्यांदा बॅटींग करताना 20 ओव्हरमध्ये 175 धावा केल्या. या सामन्यामध्ये स्टार खेळाडू रविंद्र जडेजाने कमाल गोलंदाजी केली. 4 ओव्हरमध्ये 21 धावा देत दोन गडी बाद केले. महत्त्वाचं म्हणजे जड्डूने एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट्स घेतल्या. दुसरी विकेट जडेजाने संजू सॅमसनला अप्रतिमरित्या आऊट केलं.
पाहा व्हिडीओ-
.@imjadeja on ?
He gets the wickets of Devdutt Padikkal and #RR captain Sanju Samson in the same over ? ?@ChennaiIPL are on a roll here ? ?
Watch those wickets ?
Follow the match ▶️ https://t.co/IgV0ZtiJJA#TATAIPL | #CSKvRR pic.twitter.com/4KwaPeh420
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2023
नवव्या ओव्हरमध्ये देवदत्त पड्डिकल कल आणि कर्णधार संजू सॅमसन या दोघांना बाद करत जडेजाने विकेट घेतली. ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर पड्डिकलला आऊट केलं. त्यानंतर आलेल्या संजू सॅमसनला पाचव्या चेंडूवर आऊट केलं. देवदत्तने 26 चेंडूत 38 धावांची खेळी केली. संजू सॅमसन शून्यावर बाद झाला.
चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल यांच्यामध्ये सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल संघाने 176 धावांचं आव्हान हे चेन्नईला दिलं आहे. राजस्थानकडून जोस बटलर याने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. तर शेवटच्या काही ओव्हरमध्ये शिमरॉन हेटमायरनेही धावांची छोटेखानी आक्रमक खेळी केली. चेन्नईकडून रविंंद्र जडेजा, आकाश सिंग आणि तुषार देशपांडे यांनी सर्वाधिक प्रत्येकी 2 विकट्स घेतल्या. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली 200 वा सामना चेन्नईचा संघ खेळत आहे.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिककल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, कुलदीप सेन, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (w/c), सिसांडा मगला, महेश थेक्षाना, तुषार देशपांडे, आकाश सिंग