M S Dhoni | CSK कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी याला मोठा धक्का

| Updated on: May 20, 2023 | 11:15 PM

चेन्नई सुपर किंग्स टीमने दिल्ली कॅपिट्ल्सवर 77 धावांनी विजय मिळवला. या विजयासह चेन्नईची प्लेऑफमध्ये धडक देण्याची 12 वी वेळ ठरली. मात्र या दरम्यान धोनीसाठी वाईट बातमी समोर आली आहे.

M S Dhoni | CSK कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी याला मोठा धक्का
Follow us on

नवी दिल्ली | चेन्नई सुपर किंग्स टीमने दिल्ली कॅपिट्ल्स टीमवर रविवारी 20 मे रोजी आयपीएल 16 व्या मोसमातील 67 व्या सामन्यात 77 धावांनी विजय मिळवला. चेन्नईने दिल्लीसमोर विजयासाठी 224 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र दिल्लीला चेन्नईच्या भेदक माऱ्यासमोर 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 146 धावाच करता आल्या. चेन्नईने या विजयासह अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवत प्लेऑफमध्ये धडक मारली. तसेच केकेआरने लखनऊ विरुद्धच्या सामन्यात 80 धावा पूर्ण करताच चेन्नईचं प्लेऑफमधील दुसरं स्थान निश्चित झालं. त्यामुळे आता क्वालिफायर 1 मॅचमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा सामना रंगणार आहे. या सामन्याआधी चेन्नईचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनी याच्यासाठी वाईट बातमी समोर आली आहे.

शिवमने दिल्ली विरुद्ध 9 बॉलमध्ये 3 कडक सिक्सच्या मदतीने 22 धावा केल्या. यासह चेन्नईच्या टीममधील ऑलराउंडरनेच धोनीला मोठा झटका दिला आहे. चेन्नईच्या शिवम दुबे याने धोनीचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. दुबे या 3 सिक्ससह चेन्नईसाठी आयपीएल 2023 या मोसमात सर्वाधिक सिक्स ठोकणारा फलंदाज ठरला. दुबेच्या नावावर 33 सिक्सची नोंद झाली. यासह दुबेने धोनीचा 2018 मधील रेकॉर्ड ब्रेक केला. धोनीने 2018 मध्ये चेन्नईसाठी 30 सिक्स ठोकले होते. शिवम दुबे यासह चेन्नई सुपर किंग्ससाठी एका मोसमात सर्वाधिक सिक्स ठोकण्याबाबत चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन | डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), रिली रोसोव, यश धुल, अमन हकीम खान, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, चेतन साकारिया, खलील अहमद आणि एनरिक नॉर्टजे.

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन | एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, दीपक चहर, तुषार देशपांडे आणि महेश तीक्षणा.