M S Dhoni | धोनीने चेन्नईला 4 वेळा जिंकवलं, मात्र जाता जाता चाहत्यांना दुखावलं, नक्की काय झालं?

| Updated on: May 20, 2023 | 5:54 PM

महेंद्रसिंह धोनी, चेन्नई सुपर किंग्सचा यशस्वी कर्णधार आणि दत्तकपुत्र. धोनीने चेन्नईला आयपीएलमध्ये हवं ते मिळवून दिलं. मात्र या 16 व्या हंगामात धोनीने जाता जाता चाहत्यांसोबत हे बरोबर नाही केलं.

M S Dhoni | धोनीने चेन्नईला 4 वेळा जिंकवलं, मात्र जाता जाता चाहत्यांना दुखावलं, नक्की काय झालं?
Follow us on

नवी दिल्ली | आयपीएल 16 व्या मोसमातील 67 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आहेत. चेन्नईने या सामन्यात टॉस जिंकून 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 223 धावा केल्या. त्यामुळे दिल्ली कॅपिट्ल्सला विजयासाठी 224 धावांचं आव्हान मिळालं. चेन्नईच्या ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे या सलामी जोडीने 141 धावांनी भागीदारी केली. चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवे याने सर्वाधिक 87 धावांची खेळी केली. तर ऋतुराज 79 धावा करुन माघारी परतला. शिवम दुबे याने 22 धावा जोडल्या. तर रविंद्र जडेजा याने नाबाद 20 रन्स केल्या.

दिल्ली आणि चेन्नईचा हा या हंगामातील साखळी फेरीतील अखेरचा सामना आहे. दिल्लीचं प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आलंय. तर चेन्नईला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी दिल्लीवर विजय आवश्यक आहे. त्यामुळे चेन्नई प्लेऑफमध्ये खेळण्याची किमान शक्यता आहे. मात्र असं असलं तरी चेन्नईचा हा अधिकृतरित्या अखेरचा सामना आहे.

चेन्नईचा या मोसमातील अखेरचा सामना, तसेच धोनीचाही हा अखेरचाच सामना. धोनीने अजून निवृत्तीबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र तरीही धोनी निवृत्ती घेणार असल्याचा कयास बांधला जात आहे. त्यामुळे गेल्या काही सामन्यांपासून धोनीला प्रत्येक मैदानात चाहत्यांकडून निरोप दिला जात आहे. धोनीला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये घरच्या मैदानात निरोप दिला गेला होता. कारण चेन्नईचा घरच्या मैदानातील तो या हंगामातील अखेरचा सामना होता.

धोनीनेही मैदानात फेरी मारुन चाहत्यांचे आभार मानले. आता दिल्ली विरुद्धच्या सामन्यानंतर धोनी पुढे आयपीएलमध्ये खेळेल की नाही, हे निश्चित नाही. मात्र आपल्या लाडक्या धोनीला आयपीएलमध्ये अखेरचं पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये एकच गर्दी केलीय. फक्त धोनी नि धोनीसाठी चेन्नईला मानणारा एक वर्ग आहे. धोनीला पाहण्यासाठी कुणी दुप्पट रक्कम मोजून तिकीट खरेदी केली, का तर आपल्या लाडक्या खेळाडूला अखेरचं क्रिकेटच्या मैदानात खेळताना पाहण्यासाठी.

धोनीचे चाहते मोठ्या अपेक्षेने हा सामना पाहण्यासाठी आले होते. पण सामन्यादरम्यान असं काही झालं ज्यामुळे स्टेडियममध्ये शांतता पसरली. नक्की काय झालं, हे आपण जाणून घेऊयात.

शिवम दुबे आऊट झाल्याने चेन्नईची 18 ओव्हरमध्ये 2 बाद 195 अशी स्थिती झाली. चेन्नईच्या समर्थकांना दुबे आऊट झाल्याचं काहीच वाईट वाटलं नाही. कारण आता मैदानात येणार होता धोनी, कॅप्टन कूल धोनी, महेंद्रसिंह धोनी. धोनी मैदानात येणार समजताच चाहत्यांमध्ये एकच उर्जा संचारली. संपूर्ण मैदानात धोनी धोनी असा जयघोष ऐकू यायला लागला.

दुबे आऊट झाला तेव्हा चेन्नईच्या डावातील 2 ओव्हर बाकी होत्या. त्यामुळे आपल्या लाडक्या धोनीकडून त्याच्या स्टाईलमध्ये फिनिशिंग टच पाहायला मिळेल, अशी चाहत्यांना आशा होती. मात्र 4 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून देणाऱ्या धोनीने चाहत्यांना नाराज केलं. धोनीला आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये डाव फिनिशिंग टचने संपवता आला नाही. धोनीला 20 ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर फ्री 2 फ्री हिट खेळण्याची संधी मिळाली.

धोनीकडून या फ्री हिटवर मोठ्या फटक्याची आशा प्रत्येक चाहत्याला होती. मात्र धोनीने चाहत्यांचा हिरमोड केला. धोनीला एकही मोठा फटका मारता आला नाही. धोनीने डावातील शेवटच्या बॉलवर धावून 2 धावा घेतल्या. मात्र मोठा फटका काही जमलाच नाही. त्यामुळे मैदानात धोनी धोनी असं जयघोष करणाऱ्या चाहत्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला.

धोनीला विशेष काही करता आलं नाही. धोनीने 4 बॉलमध्ये नाबाद 5 धावाच करता आल्या. धोनीने एकही मोठा फटका न मारल्याने चाहत्यांचे तिकीटाचे पैसे वाया गेल्याचं सोशल मीडियावर म्हटलं जात आहे.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन | डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), रिली रोसोव, यश धुल, अमन हकीम खान, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, चेतन साकारिया, खलील अहमद आणि एनरिक नॉर्टजे.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन) | एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, दीपक चहर, तुषार देशपांडे आणि महेश तीक्षणा.