नवी दिल्ली | आयपीएल 16 व्या मोसमातील 7 वा सामना हा दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यात पार पडला. या सामन्यात गुजरातने दिल्लीवर 6 विकेट्सने विजय मिळवला. दिल्लीने गुजरातला विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिल होतं. गुजरातने हे आव्हान 18.1 ओव्हरमध्ये 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. साई सुदर्शन, मोहम्मद शमी आणि राशिद खान ही तिकडी गुजरातच्या विजयाची शिल्पकार ठरली. आधी राशिद आणि शमी या दोघांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेत दिल्लीला रोखलं. तर त्यानंतर साई सुदर्शनने नाबाद अर्धशतकी खेळी करत गुजरातच्या विजयचा मार्ग सोपा केला. गुजरातने या विजयासह मोठा कारनामा केला आहे.
गुजरातचा हा विजयी धावांचं पाठलाग करताना एकूण 10 वा विजय ठरला. विशेष बाब म्हणजे गुजरातने आतापर्यंत 11 सामन्यांमध्ये विजयी धावांचा पाठलाग केलाय. त्यापैकी 10 वेळा विजय मिळवलाय. तर फक्त एकदाच पराभव स्वीकारावा लागलाय. यावरुन गुजरात टीमचा चेसिंगमध्ये हातखंडा असल्याचं स्पष्ट होतं.
गुजरातने टॉस जिंकून दिल्लीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 162 धावा केल्या. दिल्लीकडून कॅप्टन डेव्हिड वॉर्नर याने 37, अक्षर पटेल याने 36 रन्सची खेळी केली. सफराज खान याने 30 धावा केल्या. अभिषेक पोरेलने 20 धावा केल्या. तर गुजरातकडून मोहम्मद शमी आणि राशिद खान या दोघांनी 3-3 विकेट्स घेतल्या. तर अल्जारी जोसेफने 2 विकेट्स घेतल्या.
गुजरातची 163 धावांच्या आव्हानाचं पाठलाग करताना अपेक्षित सुरुवात राहिली नाही. गुजरातने पहिल्या 3 विकेट्स झटपट गमावल्या. त्यामुळे गुजरातची 3 बाद 54 अशी स्थिती झाली. मात्र साई सुदर्शन मैदानात घट्ट पाय रोवून उभा होता. तसेच विजय शंकर आणि डेव्हिड मिलर या दोघांनी दिलेल्या सोबतीमुळे गुजरातचा विजय सोपा झाला.
गुजरातकडून सुदर्शनने 48 बॉलमध्ये नाबाद 62 धावांची खेळी केली. डेव्हिड मिलरने नॉट आऊट 31 रन्स केल्या. विजय शंकर 28 रन्स करुन आऊट झाला. तर शुबमन गिल आणि ऋद्धीमान साहा या दोघांनी प्रत्येकी 14 धावा केल्या. तर कॅप्टन हार्दिक पंड्या 5 धावांवर आऊट झाला. दिल्लीकडून एनरिच नॉर्तजे याने 2 विकेट्स घेतल्या. तर मिचेल मार्श आणि खलील अहमद या दोघांनी 1-1 विकेट घेतला.
डेविड वॉर्नर (कॅप्टन) , पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, एसएन खान, आरआर रोस्सोव, अमन हकिम खान, एआर पटेल, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, एनरिक नार्त्झे आणि मुकेश कुमार.
हार्दिक पंड्या (कर्णधार) , वृद्धिमान साहा, शुबमन गिल, साई सुदर्शन, डेविड मिलार, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल, यश दयाल आणि अलझारी जोसेफ.