DC vs KKR | दिल्लीचा सलग पाच पराभवानंतर पहिला विजय, केकेआरची 4 विकेट्सने हार

| Updated on: Apr 21, 2023 | 1:06 AM

दिल्ली कॅपिट्ल्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. 20 एप्रिल रोजी सुरु झालेला हा सामना 21 एप्रिलला संपला.

DC vs KKR | दिल्लीचा सलग पाच पराभवानंतर पहिला विजय, केकेआरची 4 विकेट्सने हार
Follow us on

नवी दिल्ली | दिल्ली कॅपिट्ल्स टीमने अखेर सलग 5 सामन्यातील पराभवानंतर पहिल्या विजयाची नोंद केली आहे. दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2023 मध्ये पहिलावहिला विजय मिळवला आहे. मात्र दिल्लीला हा विजयही सहजासहजी मिळाला नाही. दिल्लीला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या या सामन्यात 4 चेंडू राखून विजय मिळाला. कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिट्वल्सला विजयासाठी 128 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र दिल्लीने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्याने हे सोपं आव्हान अवघड झालं. तसेच केकेआरच्या गोलंदाजांनीही कडक बॉलिंग करत सहजासहजी हार मानली नाही. दिल्लीने 128 धावांचं विजयी आव्हान 19.2 ओव्हरमध्ये 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. दिल्लीचा कॅप्टन डेव्हिड वॉर्नर हा विजयाचा शिल्पकार ठरला.

दिल्ली कॅपिट्ल्सकडून कॅप्टन डेव्हिड वॉर्नर याने सर्वाधिक 57 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर पृथ्वी शॉ याने 13 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर मिचेल मार्श आणि फिलीप साल्ट हे दोघे स्वसतात आऊट झाले. मात्र वॉर्नर एका बाजूला मैदानात पाय घट्ट रोवून होता. वॉर्नरने अर्धशतक ठोकलं. त्यामुळे दिल्ली सहज जिंकेल, असं वाटत होतं. मात्र अर्धशतकानंतर वॉर्नरही आऊट झाला. यानंतर मनिष पांडे यानेही 21 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यामुळे लो स्कोअरिंग सामन्यात भलताच ट्वि्स्ट आला. सामना रंगतदार स्थितीत पोहचला. हे कमी की काय म्हणून अमन खान हा देखील झिरोवर आऊट झाला. मात्र त्यानंतर अक्षर पटेल आणि ललित यादव मैदानात होते.

दिल्लीला अखेरच्या ओव्हरमध्ये 7 धावांची गरज होती. दिल्लीने या 7 धावा 2 चेंडूत पूर्ण केल्या. दिल्लीने यासह 4 चेंडू आणि तितक्याच विकेट्स राखून विजय मिळवला. अक्षरने निर्णायक 19 नाबाद आणि ललितने नाबाद 4 धावा केल्या. केकेआरकडून वरुण चक्रवर्थी, अनुकूल रॉय आणि नितीश राणा या तिकडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

दिल्ली कॅपिट्ल्सचा पहिला विजय

केकेआरची बॅटिंग

दरम्यान त्याआधी दिल्ली कॅपिट्ल्सने टॉस जिंकून केकेआरला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. केकेआरने दिल्ली कॅपिट्ल्सच्या भेदक माऱ्यासमोर 20 ओव्हरमध्ये ऑलआऊट 127 धावा केल्या. केकेआरकडून ओपनर जेसन रॉय याने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. तर आंद्रे रसेल याने 38 धावांचं योगदान दिलं. मनदीप सिंह याने 12 धावांचं योगदान दिलं. दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर 5 जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. वरुण चक्रवर्ती याने नाबाद 1* रन केली. दिल्ली कॅपिट्ल्सकडून इशांत शर्मा, कुलदीप यादव, अक्षर पटेल, एनरिच नॉर्तजे या चौघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर मुकेश कुमार याने 1 विकेट घेत इतर गोलंदाजांना चांगली साथ दिली.

केकेआर प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कॅप्टन), वेंकटेश अय्यर, लिटॉन दास, जेसन रॉय, सुनील नरेन, रिंकू सिंह, मंदीप सिंह, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, उमेश यादव आणि कुलवंत खेजरोलिया.

दिल्ली कॅपिट्ल्स इलेव्हन | डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मिचेल मार्श, मनीष पांडे, फिल सॉल्ट, ललित यादव, अमन खान, अक्षर पटेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्खिया, इशांत शर्मा आणि मुकेश कुमार.