दिल्ली | दिल्ली कॅपिट्ल्स टीमचा उपकर्णधार आणि ऑलराउंडर अक्षर पटेल याने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात मोठा कारनामा केला आहे. दिल्ली कॅपिट्ल्स अडचणीत असताना अक्षर याने टॉप गिअर टाकत मैदानात जोरदार फटकेबाजी करत अर्धशतक पूर्ण केलं. अक्षरने अवघ्या 22 बॉलमध्ये हे अर्धशतक पूर्ण केलं. अक्षरच्या आयपीएल कारकीर्दीतील हे पहिलंवहिलं अर्धशतक ठरलं. अक्षरने या अर्धशतकी खेळीसह अनोखी कामगिरी केली आहे.
अक्षरची तब्बल 125 सामन्यांनंतर पहिलवहिल्या अर्धशतकाची प्रतिक्षा संपली. विशेष म्हणजे अक्षरने हे अर्धशतक ठोकत या 16 व्या मोसमात वेगवान शतक ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवलं. अक्षर येण्याआधी कॅप्टन डेव्हिड वॉर्नर सलामीपासून खेळत होता. मात्र वॉर्नरकडून ज्या वेगाने धावांची अपेक्षा होती, तसं करण्यात त्याला संघर्ष करावा लागत होता.
अक्षर पटेल याचं अर्धशतक
FIFTY off just 2⃣2⃣ deliveries!@akshar2026 brings up his half-century in style with a MAXIMUM straight down the ground ?
Follow the match ▶️ https://t.co/6PWNXA2Lk6#TATAIPL | #DCvMI pic.twitter.com/tuwHsAgVee
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2023
अखेर अक्षरने मैदानात येत सटासट फटाफट बॅट फिरवत मैदानात चारही बाजूला फटकेबाजी केली. अक्षरकडून अर्धशतकानंतर आणखी चांगल्या आणि वेगवान खेळीची अपेक्षा होती. मात्र अक्षर पटेल आऊट झाला. अक्षरने 25 बॉलमध्ये 4 चौकार आणि 5 सिक्सच्या मदतीने 54 धावांची खेळी केली. दिल्लीला 165 धावांवर अक्षरच्या रुपात सहावा झटका बसला. दिल्लीचा यानंतर डाव गडगडला. दिल्लीने यानंतर अवघ्या 7 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स गमावल्या. दिल्ली 19.4 ओव्हरमध्ये 172 धावांवर ऑलआऊट झाली.
दरम्यान दिल्लीकडून अक्षरशिवाय कॅप्टन डेव्हिड वॉर्नर याने 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. पृथ्वी शॉ 15 धावांवर आऊट झाला. मनिष पांडे याने 26 रन्स केल्या.कुलदीप यादव शून्यावर आऊट झाला. मुस्तफिजुर रहिम 1 धावेवर नाबाद राहिला. तर उर्वरित फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), कॅमरुन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, नेहाल वढेरा, ऋतिक शौकीन, जेसन बेहरनडॉर्फ, अरशद खान, पियूष चावला आणि रायली मेरेडीथ.
दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग इलेव्हन | डेविड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, मनीष पांडे, यश धूळ, रोवमॅन पावेल, ललित यादव, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), कुलदीप यादव, अक्षर पटेल, एनरिक नॉर्खिया आणि मुस्तफिजुर रहमान.