नवी दिल्ली | आयपीएल 16 व्या सिजनमध्ये लखनऊ विरुद्ध आरसीबी यांच्यात 1 मे रोजी सामना पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळरु टीमचा आक्रमक बॅट्समन विराट कोहली नवीन उल हक आणि गौतम गंभीर यांच्याशी भिडला. नवीन उल हक याच्यासोबत सामन्यातील दुसऱ्या डावात 17 व्या ओव्हरमध्ये विराट कोहली याचं वाजलं. सामना संपल्यानंतर याच विषयावरुन विराट आणि गंभीर यांच्या दोघांमध्ये वाद झाला. या वादाची क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा झाली. या अशा घटनेमुळे क्रिकेटच्या प्रतिमेला डाग लागला. दरम्यान या राड्यानंतर विराट कोहली मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. विराट असा धमाका करणार आहे, जे क्रिकेट विश्व कधीच विसरु शकणार नाहीत.
आयपीएल 16 व्या हंगामात शनिवारी 6 मे रोजी डबल हेडरचं आयोजन करण्यात आलंय. या डबल हेडरमधील पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात पार पडणार आहे. तर दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने असतील. या सामन्यात विराट कोहली याला धमाका करण्याची संधी आहे.
विराट याला आयपीएलमध्ये 7 हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्याची संधी आहे. विराटला हा इतिहास रचण्यासाठी फक्त नि फक्त 12 धावांची गरज आहे. विराट दिल्ली विरुद्धच्या सामन्यात 12 धावा पूर्ण करताच आयपीएलमध्ये 7 हजार रन्स पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरेल.
विराट कोहली याने आतापर्यंत आयपीएल इतिहासात 232 सामन्यांमधील 224 डावात 36.59 च्या सरासरी आणि 129.58 या स्ट्राईक रेटने 6 हजार 988 धावा केल्या आहेत. विराटने या दरम्यान 49 अर्धशतकं आणि 5 शतकं ठोकली आहेत. विराटची 113 ही आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीम | फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड, हर्षल पटेल, वैद्य पटेल , सिद्धार्थ कौल, केदार जाधव, मायकेल ब्रेसवेल, विजयकुमार विशक, फिन ऍलन, सोनू यादव, मनोज भंडागे, शाहबाज अहमद, आकाश दीप, राजन कुमार, अविनाश सिंग आणि हिमांशू शर्मा.
दिल्ली कॅपिटल्स टीम | डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मनीष पांडे, रिली रॉसौ, प्रियम गर्ग, अक्षर पटेल, रिपल पटेल, अमन हकीम खान, कुलदीप यादव, एनरिक नोर्टजे, इशांत शर्मा, खलील अहमद, मिचेल मार्श, सरफराज खान, लुंगी एनगिडी, प्रवीण दुबे, मुकेश कुमार, रोवमन पॉवेल, पृथ्वी शॉ, ललित यादव, चेतन साकारिया, यश धुल, विकी ओस्तवाल आणि अभिषेक पोरेल.