मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक स्टार खेळाडूंनी अपेक्षाभंग केलेला दिसला. क्रिकेट चाहत्यांना त्यांच्याकडून जशा प्रदर्शनाची अपेक्षा होती त्यांना फारशी काही कमाल करून दाखवता आली नाही. यामध्ये अनेक भारतीय आणि परदेशी खेळाडू आहेत. मात्र एक असा खेळाडू ज्याला यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत आपल्यासाठी टीम इंडियामध्ये कमबॅक करण्याची संधी होती. परंतु असं काही झालं नाही पण आता या खेळाडूचं आयपीएल करिअरही संपणार असं दिसत आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा कोच रिकी पॉन्टिंग मोजकंच बोलला पण खूप काही बोलून गेलाय.
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून पृथ्वी शॉ आहे. पृथ्वी खेळत नाही हे खरे आहे. त्याने जसं टीम मॅनेजमेंटला हवं तस प्रदर्शन केलं नाही. आतपापर्यंत एकाही खेळाडूने मिळालेल्या संधीचं सोनं केलेलं नाही. मला वाटतं की या मोसमातील ही पाचवी, सहावी किंवा वेळ होती, आम्ही सामन्याच्या विकेट गमावल्या. एकदा तर आम्ही सामन्याच्या पहिल्या षटकात दोन विकेट गमावल्या आहेत. बॅटींगमध्ये आम्ही ज्याप्रकारे नियोजन करत आहोत त्याप्रमाणे प्रदर्शन होताना दिसत नसल्याचं रिकी पॉन्टिंग म्हणाला.
यंदाच्या मोसमामध्ये दिल्ली संघाची कामगिरी अतिशय खराब झालेली पाहायला मिळाली. काही हातातले सामने त्यांनी गमावले, त्यासोबतच बॅटींग लाईनअप पूर्णपणे फ्लॉप जात आहे. एकंदरित याचाच फटका दिल्लीला बसल्याने दिल्ली पॉइंट टेबलमध्ये तळाला स्थानावर फेकली गेली आहे.
अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, एनरिक नॉर्टजे, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, सरफराज खान, मुस्तफिजुर रहमान, कुलदीप यादव, खलील अहमद, चेतन साकारिया, ललित यादव, रिपल पटेल, यश धुल, रोवमन पॉवेल, प्रवीण दुबे, लुंगी एनगिडी, विकी ओस्टवाल , अमन खान, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनीष पांडे, रिली रोसौ, अभिषेक पोरेल, प्रियम गर्ग