मुंबई : आयपीएल 2023 चा 50 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात पार पडला. हा सामना बंगळुरुने 7 गडी राखून जिंकला. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं प्लेऑफचं गणित आणखी कठीण झालं आहे. बंगळुरुने 20 षटकात 4 गडी गमवून 181 धावा केल्या आणि विजयासाठी 182 धावांचं आव्हान दिलं आहे. दिल्लीने हे आव्हान 16.4 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह दिल्लीने स्पर्धेत जबरदस्त कमबॅक केलं आहे. तर बंगळुरुची वाट बिकट झाली आहे.
बंगळुरुने विजयासाठी दिलेल्या 182 धावांचा पाठलाग करताना फिल सॉल्ट आणि डेविड वॉर्नरने आक्रमक खेळी केली. या जोडीने पहिल्या गड्यासाठी 60 धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या मिशेल मार्शनेही आक्रमक पवित्रा कायम ठेवला. त्याने 17 चेंडूत 26 धावा केल्या. पण हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका मारताना बाद झाला. मात्र सॉल्टने आक्रमक पवित्रा कायम ठेवला. त्याला रिली रोसोची चांगली साथ लाभली. त्यांनी षटकार आणि चौकाराची आतषबाजी केली. त्यामुळे चेंडू जास्त आणि धावा कमी अशी स्थिती झाली.
फिल सॉल्टने 45 चेंडूत 87 धावा केल्या. या खेळीत 6 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश आहे. अवघ्या 11 धावा आवश्यक असताना अक्षर पटेल आला आणि पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. यामुळे विजय आणखी सोपा झाला.
बंगळुरुने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फाफ आणि विराट कोहलीने सावध सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी 82 धावांची भागीदारी केली. मात्र मिशेल मार्शच्या गोलंदाजीवर अक्षर पटेलने त्याचा झेल घेतला आणि तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर आलेला ग्लेन मॅक्सवेल आपलं खातंही खोलू शकला नाही. मिशेल मार्शने त्याला पहिल्या चेंडूवर तंबूत परत पाठवलं.
दोन गडी झटपट बाद झाल्यानंतर विराट आणि महिपाल लोमरोर यांनी डाव सावरला. दोघांनी 55 धावांची भागीदारी केली. विराट कोहलीला मुकेश कुमारने तंबूचा रस्ता दाखवला. खलील अहमदने त्याचा झेल घेतला. त्याने 46 चेंडूत 55 धावांची खेळी केली.
महिपाल लोमरोरनं आयपीएलमधलं पहिलं अर्धशतक ठोकलं. त्याने 26 चेंडूत 52 धावा केल्या. त्यानंतर दिनेश कार्तिकने 9 चेंडूत 11 धावा करून बाद झाला. त्यानंतर अनुज रावतने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), केदार जाधव, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन) : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, रिली रोसो, मनीष पांडे, अमन हकीम खान, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद.