मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना जबरदस्त रंगला. एक क्षणी गुजरात बाजी मारेल असं वाटत असताने दिल्लीने सामना खेचून घेतला. प्रत्येक चेंडूवर सामन्याचं चित्र बदलत होतं. 19 व्या षटकात सलग तीन षटकार ठोकल्याने गुजरात सामना जिंकेल असंच भाकीत केलं होतं. पण इशांत शर्माने शेवटचं षटक जबरदस्त टाकत 12 धावा रोखल्या. फक्त 6 धावा दिल्या आणि गुजरातचा 5 धावांनी पराभव झाला. या विजयासह दिल्लीच्या स्पर्धेतील आशा कायम आहेत.
शेवटच्या षटकात 12 धावा आवश्यक असताना पहिल्या दोन चेंडूवर तीन धावा आल्या. त्यानंतर तिसरा चेंडू इशांत शर्माने निर्धाव टाकला. चौथ्या चेंडूवर आक्रमक खेळणारा तेवतिया बाद झाला आणि सामन्यात रंगत आली. दोन चेंडू 9 धावा आवश्यक असताना राशिद खान आला आणि दोन धावा घेतल्या. शेवटचा चेंडूवर 7 धावा आवश्यक असताना फक्त दोन धावा घेता आल्या.
When the whole Delhi ?????? ? pic.twitter.com/AoGv9IPBZ2
— Delhi Capitals (@DelhiCapitals) May 2, 2023
गुजरात विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्ली फलंदाजी घेतली खरी पण संपूर्ण डावच फसला. मोहम्मद शमीच्या पहिल्याच चेंडूवर फिल सॉल्ट बाद झाला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर डेविड वॉर्नर 2 धावांवर असताना धावचीत झाला. रिली रोस्सोही काही खास करू शकला नाही. सहा चेंडूत अवघ्या 8 धावा करून बाद झाला. मनिष पांडेला आणि प्रियम गर्गलाही मोहम्मद शमीने तंबूचा रस्ता दाखवला.
A resounding away victory for @DelhiCapitals ??#DC was full of belief tonight and they register a narrow 5-run win in Ahmedabad ????
Scorecard ▶️ https://t.co/VQGP7wSZAj#TATAIPL | #GTvDC pic.twitter.com/GWGiTIshFY
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2023
अक्षर पटेल आणि अमन खान यांची जोडी जमली. त्यांनी सहाव्या गड्यासाठी 50 धावांची भागीदारी केली. मात्र उंच फटका मारण्याच्या नादात अक्षर पटेल बाद झाला. त्याने 30 चेंडूत 27 धावा केल्या. अमन खानने आपलं अर्धशतक झळकावलं. त्याने 44 चेंडूत 51 धावा केल्या. मात्र राशीद खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. रिपल पटेलला मोहित शर्माने तंबूचा रस्ता दाखवला. गुजरातकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक म्हणजेच 4 गडी बाद केले. राशीद खानने एक तर मोहित शर्माने दोन गडी बाद केले.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): वृद्धिमान साहा, अभिनव मनोहर, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, जोशुआ लिटल.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मनीष पांडे, रिली रोसो, प्रियम गर्ग, अक्षर पटेल, रिपल पटेल, अमन हकीम खान, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा.