मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रविवारी संध्याकाळी साडे सात वाजता हा सामना असणार आहे. आतापर्यंत गुजरात आणि चेन्नई हे दोन संघ दोन वेळा आमनेसामने आले आहेत. साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात गुजरातने चेन्नईला पराभवाचं पाणी पाजलं होतं. त्यानंतर क्वॉलिफायर 1 मध्ये चेन्नईने गुजरातला पराभूत करत पराभवाची परतफेड केली. चेन्नईने गुजरातला 62 धावांनी पराभवाची धूळ चारली. आता अंतिम फेरीत हे दोन संघ तिसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत.
चेन्नई सुपर किंग्स: डेवोन कॉनवे, गायकवाड़, रहाणे, शिवम दुबे, मोईन अली, रायडू, रविंद्र जडेजा, एमएस धोनी, महीश तीक्षणा, मथीश पथिराना, दीपक चाहर
गुजरात टायटन्स: गिल, साहा, सुदर्शन, हार्दिक पांड्या, डेविड मिलर, राहुल तेवतिया, विजय शंकर, राशिद खान, मोहित शर्मा, मोहम्मद शमी, नूर अहमद
चेन्नईचा पूर्ण स्क्वॉड : एमएस धोनी, डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, सुभ्रांशु सेनापति, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, के भगत वर्मा, मोइन अली, राज्यवर्धन हंगरगेकर, शिवम दुबे, दीपक चाहर, महीश तीक्षणा, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंह, अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे, बेन स्टोक्स, मथीश पथिराना, शेख रशीद, निशांत सिंधु आणि अजय मंडल.
गुजरातचा पूर्ण स्क्वॉड : हार्दिक पंड्या, अभिनव मनोहर, शुभमन गिल, डेविड मिलर, मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, बी साई सुदर्शन, दर्शन नालकंडे, जयंत यादव, प्रदीप सांगवान, राहुल तेवतिया, शिवम मावी, विजय शंकर, अलजारी जोसफ, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, यश दयाल, केन विलियमसन, जोशुआ लिटिल, ओडीन स्मिथ, उर्विल पटेल, केएस भरत आणि मोहित शर्मा.