मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील 64 वा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. या स्पर्धेतील दिल्लीचं आव्हान संपुष्टात आलं आहे. तरी स्पर्धेत मानाचं स्थान मिळावं यासाठी प्रयत्न असेल. पण पंजाब किंग्सला प्लेऑफच्या शर्यतीत स्थान मिळवायचं असेल तर हा सामना काहीही करून जिंकावाच लागेल. या सामन्यापूर्वी जाणून घ्या बेस्ट ड्रीम 11 टीम कशी असेल.
हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा क्रिकेट मैदान फलंदाजांसाठी अनुकूल आहे. या खेळपट्टीवर फलंदाजांना चांगला फायदा मिळतो. पण असं असलं तरी फिरकीपटूंसाठी हे मैदानात तितकंच अनुकूल आहे. बर्फाळ प्रदेश असल्याने या मैदानात पडणारं दव मोठी भूमिका बजावू शकते. अशात टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करणं संघ पसंत करतील.
दिल्ली कॅपिटल्स : डेविड वॉर्नर (कर्णधार), फिल सॉल्ट (विकेटकीपर), मिशेल मार्श, प्रियम गर्ग, मनिष पांडे, अक्षर पटेल, ललित यादव, अमन खान, रिपल पटेल, कुलदीप यादव, एनरिक नार्त्जे.
पंजाब किंग्स : शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, मॅथ्यू शॉर्ट/सिकंदर रजा, लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, शाहरुख खान, ऋषि धवन, हरप्रीत बराड, राहुल चाहर, अर्शदीप सिंग.
दिल्लीचा पूर्ण स्क्वॉड : ऋषभ पंत, डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोवमॅन पॉवेल, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सरफराज खान, विक्की ओस्तवाल, यश धुल, अमन खान, एनरिक नॉर्खिया, चेतन सकारिया, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, मुस्तिफिजुर रहमान, खलील अहमद, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनीष पांडे, रिली रूसो.
पंजाबचा पूर्ण : शिखर धवन, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, प्रभसिमरन सिंह, अथर्व तायडे, हरप्रीत बरार, लियम लिविंगस्टन, राज अंगद बावा, मॅथ्यू शॉर्ट, ऋषि धवन, शाहरुख खान, अर्शदीप सिंह, बलतेज सिंह, कागिसो रबाडा, नाथन एलिस, राहुल चाहर, सैम कर्रन, सिकंदर रजा, हरप्रीत भाटिया, विद्धवत, मोहित राठी, शिवम सिंह.