बंगळुरु | आयपीएल 16 व्या मोसमातील 70 व्या आणि साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने होते. आरसीबीसाठी हा सामना प्लेऑफमध्ये पोहचण्यसाठी मस्ट विन असा होता. कारण मुंबई इंडियन्स टीमने डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद संघावर विजय मिळवला होता. मात्र गुजरात टायटन्सच्या शुबमन गिल याने ठोकलेल्या नाबाद आणि निर्णायक शतकामुळे आरसीबीचा पराभव झाला. आरसीबीने विजयासाठी दिलेल्या 198 धावांचं आव्हान गुजरातने 5 बॉलआधी 6 विकेट्स राखून पूर्ण केलं.
आरसीबीचं या पराभवसह आयपीएल 16 व्या मोसमातील प्रवास इथेच संपला. आरसीबीच्या या पराभवामुळे मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहचणारी चौथी टीम ठरली. आता मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये आपला पुढील सामना कुणा विरुद्ध खेळणार हे आपण जाणून घेऊयात. मात्र त्याआधी प्लेऑफमध्ये कोणत्या 4 टीम पोहचल्या आहेत ते पाहुयात.
प्लेऑफमध्ये गुजरात टायटन्से सर्वात आधी प्रवेश केला. त्यानंतर 20 मे रोजी आधी चेन्नई सुपर किंग्स आणि त्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सने धडक मारली. तर आता मुंबई इंडियन्स पोहचली आहे.
मुंबई प्लेऑफमध्ये पोहचणारी चौथी आणि लखनऊ तिसरी टीम ठरली. त्यामुळे लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात 24 मे रोजी एलिमिनेटर खेळवण्यात येणार आहे. हा सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
या एलिमिनेटरमध्ये जिंकणारी टीम क्वालिफायर 1 मध्ये पराभूत होणाऱ्या टीम विरुद्ध खेळेल. प्लेऑफ 2 मध्ये एलिमिनेटर जिंकणारी आणि क्वालिफायरमध्ये पराभूत संघ आमनेसामने असतील. क्वालिफायर 1 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुप किंग्स यांच्यात सामना होईल. हा सामना जिंकणारी टीम थेट फायनलमध्ये पोहचेल. तर पराभूत टीम एलिमिनेटर जिंकणाऱ्या टीम विरुद्ध क्वालिफायर 2 मध्ये भिडेल.
लखनऊ सुपर जायंट्स टीम | कृणाल पांड्या (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), काइल मेयर्स, प्रेराक मांकड, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, अमित मिश्रा, यश ठाकूर, रवी बिश्नोई, युधवीर सिंग चरक, आवेश खान बेंच स्वप्नील सिंग, डॅनियल सॅम्स, आयुष बडोनी, दीपक होडो , अर्पित गुलेरिया, मोहसिन खान, मार्क वुड, रोमॅरियो शेफर्ड, करुण नायर, नवीन-उल-हक, मनन वोहरा, कृष्णप्पा गौथम आणि करण शर्मा.
मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्शद खान, सूर्यकुमार यादव, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, विष्णू विनोद, रमणदीप सिंग, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, ख्रिस जॉर्डन, जेसन बेहरेनडॉर्फ, संदीप वॉरियर, हृतिक शोकीन, डुआन जॅन्सन, राघव गोयल आणि रिले मेरेडिथ.