मुंबई | आयपीएल 16 व्या हंगामात शनिवारी 22 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाबने मुंबई इंडियन्सची विजयी घोडदौड रोखली. या सामन्यात पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याने निर्णायक भूमिका बजावली. अर्शदीपने 4 विकेट्स घेतल्या. यापैकी 2 विकेट्स घेताना अर्शदीपने 2 वेळा 2 स्टंपचे 2 तुकडे केले.यामुळे बीसीसीआयलाही मोठं आर्थिक नुकसान झालंय. यामुळे अर्शदीप चांगलाच चर्चेत आला. मात्र यानंतर आता अर्शदीपला स्टंप तोडण्याचं आव्हान देण्यात आलंय.
पंजाबने पहिले खेळताना 8 विकेट्स गमावून 214 धावा केल्याने आणि मुंबईला 215 रन्सचं आव्हान मिळालं. मुंबई इंडियन्सनेही शानदार पद्धतीने या धावांचा पाठलाग केला. त्यामुळे मुंबईला 6 बॉलमध्ये 16 रन्सची गरज होती. अर्शदीप सिंह 20 वी ओव्हर टाकायला आला. पहिल्या बॉलवर टीम डेव्हिड याने एक रन काढली. त्यामुळे स्ट्राईकवर टिळक वर्मा आला. टिळकने दुसरा बॉल डॉट केला. तर तिसऱ्या बॉलवर टिळकला बोल्ड केलं. यात स्टंपचे 2 तुकडे झाले. अर्शदीप इतक्यावरच थांबला नाही. अर्शदीपने पुढील म्हणजेच चौथ्या बॉलवर नेहल वढेरा याची दांडी गुल केली. अर्शदीपने यावेळेसही मिडल स्टंप उडवला आणि त्याचेही 2 तुकडे केले. त्यामुळे पंजाबचा 13 धावांनी विजय झाला.
अर्शदीपने तोडलेल्या स्टंप्सची चर्चा सोशल मीडियावर अजूनही सुरु आहे. या चर्चेचा फायदा हा फेव्हीकॉल या कंपनीने घेतलाय. फेव्हीकॉल कंपनीने फेसबूक पोस्ट करत अर्शदीपला आव्हान दिलय. या फेसबूक पोस्टमध्ये स्टंपला लागल्यानंतर बॉलला भेगा गेल्याचं दिसून येत आहे. “पाजी ये स्टंप्स तोड के दिखावो”, असं म्हणत अर्शदीपला आव्हान दिलंय. फेव्हीकॉलने या संधीचा फायदा घेत जाहीरात करण्याचा डाव साधला. या फेसबूक पोस्टवर नेटकऱ्यांनी विनोदी कमेंट्स केल्या आहेत.
“हा स्टंप तोडून दाखव”
आयपीएल स्पर्धेत आधी साधे स्टंप वापरले जायचे. मात्र तंत्रज्ञान बदलंल तसं आयपीएलमध्येही बदल झाला. एलईडी लाईट असलेल्या स्टंपचा वापर सामन्यात करण्यात आला. बॉलचा स्पर्श होताच लाईट पेटते, हे या स्टंपचं वैशिष्टय. यामुळे फिल्ड अंपायर्सना निकाल घेण्यास मदत होते. या कारणामुळेच या स्टंप्सची किंमत जास्त असते. एका स्टंप्सच्या सेटची (3 स्टंप्स आणि बेल्स) किंमत जवळपास 32 लाख रुपयांच्या घरात आहे. अर्शदीपने 2 स्टंप्स तोडले. त्यामुळे बीसीसीआयला जवळपास 20 ते 23 लाख रुपयांच्या घरात फटका लागलाय. एवढ्या किंमतीत वन बीएचके घर मिळेल. आता याची नुकसान भरपाई करुन बीसीसीआय नवे स्टंप्स लावेल.
अर्शदीपने आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये मुंबईच्या बॅटिंग ऑर्डर सत्यानाश केला. यामुळे पलटणच्या चाहत्यांचा घरच्या मैदानात हिरमोड झाला. अर्शदीपने 4 ओव्हरमध्ये 29 धावांच्या मोबदल्यात मुंबईच्या 4 गोलंदाजांना आऊट केलं. यामध्ये इशान किशन, सूर्यकुमार यादव या दोघांना निर्णायक क्षणी आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.