CSK vs GT पावसामुळे सामना रद्द झाल्यास IPL Final 2023 चॅम्पियन कोणती टीम होणार?

| Updated on: May 27, 2023 | 8:46 PM

गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील क्वालिफायर 2 मॅचमध्ये पाऊस झाला होता. त्याच नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम सामना होणार आहे.हा सामना पावसामुळे रद्द झाला तर?

CSK vs GT  पावसामुळे सामना रद्द झाल्यास IPL Final 2023 चॅम्पियन कोणती टीम होणार?
Follow us on

अहमदाबाद |आयपीएल 16 व्या मोसमातील अंतिम सामना हा रविवारी 28 मे रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडणार आहे. हा महामुकाबला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सवर विजय मिळवत थेट फायनलमध्ये एन्ट्री केली होती. तर गुजरातला दुसऱ्या प्रयत्नात अंतिम फेरीत पोहचण्यात यश आलं. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. गुजरात विरुद्ध मुंबई यांच्यातील क्वालिफायर 2 मॅचला पावसामुळे अर्धा तास विलंब झाला. त्यामुळे आता जर अंतिम सामना पावसामुळे रद्द करावा लागला, तर चॅम्पियन कोण ठरणार या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेऊयात.

पावसामुळे सामना रद्द झाल्यास विनर कोण?

प्लेऑफ आणि फायनल सामन्यांसाठी नियम वेगळे आहेत. मात्र साखळी फेरीतील सामना पावसामुळे रद्द झाल्यास दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी 1-1 पॉइंट वाटून दिला जातो. त्यामुळे फायनल मॅच रद्द झाली तर निकाल कसा ठरवला जाणार, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. यंदा आयपीएल फायनलसाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे अंतिम सामन्याच्या दिवशी निकाल लावला जाईल.

फायनल सामन्यासाठी नियम काय?

चेन्नई विरुद्ध गुजरात यांच्यातील अंतिम सामना पूर्ण करण्यासाठी अधिकचे 120 मिनिटं म्हणजे 2 तास आहेत. प्रत्येक ओव्हरसाठी 5 मिनिटं ठरवण्यात आले आहेत. त्यानुसार नियोजित वेळेनुसार सुरुवात झाल्यास सामना रात्री 11 वाजून 56 मिनिटांनी संपेल. तर अर्धा तास उशिरा म्हणजे रात्री 8 वाजता सुरु झाल्यास मॅच 12 वाजून 26 मिनिटांनी संपेल. मात्र एकही बॉल न खेळवता सामना रद्द झाल्यास ग्रुप स्टेजमध्ये पॉइंट्स टेबलमधील नंबर 1 असलेली टीम विजेता ठरेल.

गुजरातने साखळी फेरीत 10 सामने जिंकून अव्वलस्थान पटकावलं होतं. तर चेन्नईने 8 विजयांसह दुसरा स्थान मिळवलं. त्यामुळे महाअंतिम सामना पावसामुळे रद्द झाल्यास गुजरात सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन होईल.

गुजरात टायटन्स टीम | हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल, विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा, जयंत यादव, जोशुआ लिटल, शिवम मावी, रविश्रीनिवासन साई किशोर, श्रीकर भारत, साई सुदर्शन, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, मॅथ्यू वेड, दासून शनाका, ओडियन स्मिथ, दर्शन नळकांडे, उर्विल पटेल आणि यश दयाल.

चेन्नई सुपर किंग्स टीम | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.