“आमच्या कार्यकर्त्याने CSK ला IPL जिंकून दिलं”, भाजप नेत्याचं ट्विट

| Updated on: May 31, 2023 | 4:59 PM

चेन्नई सुपर किंग्स टीमला आमच्या कार्यकर्त्याने आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे, असा दावा भाजपच्या बडया नेत्याने केला आहे. जाणून घ्या.

आमच्या कार्यकर्त्याने CSK ला IPL जिंकून दिलं, भाजप नेत्याचं ट्विट
Follow us on

अहमदाबाद | आयपीएल 16 व्या मोसमातील अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स टीमने राखीव दिवशी 29 मे रोजी गुजरात टायटन्सला पराभवाची धुळ चारली. चेन्नईला विजयासाठी डकवर्थ लुईस नियमानुसार 15 ओव्हरमध्ये 171 धावांचं आव्हान मिळालं होतं. रविंद्र जडेजा याने शेवटच्या बॉलवर चौकार ठोकत चेन्नईला थरारक विजय मिळवला. चेन्नई यासह पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन ठरली.चेन्नईने यासह सर्वाधिक आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या मुंबई इंडियन्सच्या विक्रमाची बरोबली केली. चेन्नईने गुजरातला गुजरातच्या होम ग्राउंडमध्ये पाणी पाजलं. चेन्नईचं या विजयानंतर सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

चेन्नईवर कौतुकासह बक्षिसांचा वर्षाव होत आहे. चेन्नईने आपला स्टार बॅट्समन अंबाती रायुडू याला ट्रॉफी जिंकून अविस्मरणीय असा निरोप दिला. चेन्नईने एक ट्रॉफी जिंकत अनेक गोष्टी साध्य केल्या. दरम्यान या विजयानंतर भाजप नेत्याने केलेला अजब दावा सध्या चर्चेचा विषय ठरला आगहे. आमच्या कार्यकर्त्याने चेन्नईला आयपीएल ट्रॉफी जिंकून दिल्याचा दावा या नेत्याने केला आहे. त्यामुळे याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

ट्विटमध्ये काय म्हटलंय?

तामिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांनी चेन्नईच्या विजयावर ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली. “क्रिकेटर जडेजा हा भाजपचा कार्यकर्ता आहे. त्यांच्या पत्नी श्रीमती रिवाबा जामनगर उत्तर मतदारसंघातून भाजपच्या आमदार आहेत आणि तो गुजराती! भाजप कार्यकर्ता जडेजानेच सीएसकेला विजय मिळवून दिला”, असं ट्विटमध्ये म्हटलंय की,

के अन्नामलाई यांचं ट्विट

अन्नामलाई यांच्या प्रतिक्रियेचे काही सोशल मीडियावरील पोस्टही व्हायरल झालेत.या पोस्टमध्ये चेन्नईच्या विजयाला गुजरात मॉडलवर द्रविडियन मॉडलचा विजय असं म्हटलं गेलं. अन्नामलाई यांनी एका वाहिनीशी संवाद साधला. “मला चेन्नई जिंकल्याचा गर्व आहे. मात्र सोबतच गुजरात टायटन्सचाही आनंद साजरा करायला हवा”, असं यावेळेस अन्नामलाई यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान रविंद्र जडेजा याची पत्नी रिवाबा जडेजा या भाजप आमदार आहे. रिवाबा या जामनगर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. रिवाबा यांनी 2022 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 80 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. रिवाबा यांनी 2019 मध्ये भाजप प्रवेश केला होता.