अहमदाबाद | आयपीएल 16 व्या मोसमात गुजरात टायटन्सने विजयी सलामी दिली आहे. गुजरातने चेन्नई सुपर किंग्सवर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. चेन्नईने गुजरातला विजयासाठी 179 धावांचं आव्हान दिलं होतं. गुजरातने हे आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात 4 चेंडू राखून पूर्ण केलं. गुजरातने 19.2 ओव्हरमध्ये 5 बाद 182 धावा केल्या. गुजरातकडून शुबमन गिल याने सर्वाधिक 63 धावा केल्या. मात्र अखेरीस राहुल तेवतिया आणि राशिद खान या जोडीने गुजरातला विजयापर्यंत पोहचवलं
दरम्यान त्याआधी गुजरातने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 178 धावा केल्या. चेन्नईकडून ऋुतुराज गायकवाड याने सर्वाधिक 92 धावांची खेळी केली. चेन्नईकडून ऋतुराजने सर्वाधिक 92 धावांची खेळी केली. ऋतुराजने या खेळीत 50 बॉलमध्ये 4 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने या धावा केल्या.
तसेच ऋतुराज व्यतिरिक्त मोईन अली याने 23, शिवम दुबे 19, महेंद्रसिंह धोनी 14*, अंबाती रायुडू, बेन स्टोक्स 7, तर रविंद्र जडेजा आणि डेव्हॉन कॉनवे या दोघांनी प्रत्येकी 1 धावा केली.
तर गुजरातकडून मोहम्मद शमी, राशिद खान आणि अल्झारी जोसेफ या तिघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर जोशुआ लिटील याने पदार्पणातील सामन्यात 1 विकेट घेत आश्वासक सुरुवात केली.
दरम्यान गुजरातचा हा चेन्नई विरुद्धचा सलग तिसरा विजय ठरला आहे. याआधी गुजरातने चेन्नईचा गेल्या 2022 मध्ये आयपीएलच्या 15 व्या मोसमात 2 वेळा पपाभव केला होता. गुजरातने 2022 मध्ये चेन्नई विरुद्धच्या पहिल्या सामन्यात 3 विकेट्स विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात 7 विकेट्सने चेन्नईला पराभूत केलं होतं.
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, मोईन अली, रविंद्र जडेजा, शिवम दुबे, दीपक चहर, मिचेल सँटनर आणि राजवर्धन हंगरगेकर
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), केन विल्यमसन, विजय शंकर, राहुल तेवतिया, आर खान, मोहम्मद शमी, जोशवा लिटल, वाय दयाल आणि अल्जारी जोसेफ.