मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेचा अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सुरु आहे. चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातने 20 षटकात 4 गडी गमवून 214 धावा केल्या आणि विजयासाठी 215 धावांचं आव्हान दिलं. मात्र या सामन्यात पावसाने हजेरी लावल्याने चेन्नईचा डाव सुरु होण्यास उशीर झाला. असं असलं तरी गुजरातच्या फलंदाजीचा आनंद खास व्यक्तींनी घेतला. मैदानात बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली आहे. यात सारा अली खान आणि विक्की कौशल यांचाही समावेश आहे.
सारा अली खान आणि विक्की कौशल आगामी चित्रपट ‘जरा हटके जरा बचके’ एकत्र दिसणार आहेत. रिलीजपूर्वी दोघंही या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. या दरम्यान दोघांनी आयपीएल सामना पाहण्यासाठी मैदानात हजेरी लावली. एकीकडे, शुभमन गिलचं नाव सारा सोबत जोडलं जात असताना लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नेमकी सारा अली खान की सारा तेंडुलकर असा प्रश्न पडला आहे.
शुभमनचं नाव सारासोबत जोडलं जात असलं तरी यात काही तथ्य नाही हे देखील तितकंच खरं आहे. अंतिम फेरीचा सामना पाहण्यासाठी सारा अली खानने हजेरी लावल्याने प्रेक्षकांनी फोटो क्लिक केले. तसेच सोशल मीडिया युजर्स दोघांचे फोटो शेअर करत आहेत. सारा अली खान स्टायलिश ब्लू जीन्स आणि व्हाईट शॉर्ट टॉप घालून आली आहे.
Vicky Kaushal and Sara Ali Khan are here to watch the IPL FINAL SHOWDOWN? pic.twitter.com/IPznIqvDEL
— Jeya Suriya (@MSPMovieManiac) May 29, 2023
Vicky and Sara today at the Ahmedabad stadium to watch #GTvsCSK ✨#VickyKaushal #SaraAliKhan #IPL2023Final pic.twitter.com/lkGWV9PToq
— A ? (@scrappinthrough) May 29, 2023
दुसरीकडे, सारा अली खान आणि शुभमन गिल या दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केलं आहे. त्यामुळे या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याचं सांगण्यात येत आहे.पण आता सारा अली खान गुजरात टायटन्सला पाठिंबा देताना दिसत आहे. गुजरात टायटन्ससाठी शुभमन गिलने फक्त 39 धावा केल्या आहेत. आयपीएल सामना रविवारी खेळवला जाणार होता. मात्र पावसामुळे रद्द करण्यात आला आणि आता सोमवारी होत आहे.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुधारसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रुतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार/विकेटकीपर), दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे, महेश तीक्षणा