GT vs KKR : टीम इंडियाला ज्या मॅचविनरची गरज होती अखेर तो मिळालाच, सांगून ठोकले सलग 3 सिक्सर!

| Updated on: Apr 09, 2023 | 9:38 PM

कोलकत्ता नाईट रायडर्स यामध्ये भारताला ज्या खेळाडूची गरज आहे तशाच प्रकारचं प्रदर्शन मॅचमध्ये एका खेळाडूने केलं आहे. नेमका खेळाडू कोण आहे हा खेळाडू?

GT vs KKR : टीम इंडियाला ज्या मॅचविनरची गरज होती अखेर तो मिळालाच, सांगून ठोकले सलग 3 सिक्सर!
Follow us on

मुंबई : काही महिन्यांवर वर्ल्डकप आला आहे. वर्ल्डकप संघामध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी सर्व खेळाडू आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच आजचा जो सामना आहे गुजरात टायटन्स वि. कोलकत्ता नाईट रायडर्स यामध्ये भारताला ज्या खेळाडूची गरज आहे तशाच प्रकारचं प्रदर्शन मॅचमध्ये एका खेळाडूने केलं आहे. नेमका खेळाडू कोण आहे तर हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून तर विजय शंकर आहे.

विजय शंकरने सामन्यात अवघ्या 24 चेंडूमध्ये 63 धावांची धमाकेदार खेळी केली. तर या खेळीमध्ये त्याने तब्बल पाच षटकार ठोकले आणि चार चौकार मारले. यातील यातील तीन षटकार हे शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने मारले होते. या खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्स संघाने 200 चे पल्ला पार केला.

पाहा व्हिडीओ- 

 

गुजरात संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 204 धावा केल्या. यामध्ये विजय शंकरने सर्वाधिक 63 धावा केला तर साई सुदर्शनने 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यासोबतच सलामीवीर शुबमन गिलनेही 39 धावा करत एक चांगली खेळी केली मात्र त्याला मोठ्या खेळीत रूपांतर करता आलं नाही. सुनील नारायण ने त्याला बात करत त्याची ही खेळी थांबवली.

वर्ल्ड कप साठी भारतीय निवड समिती ipl मध्ये ज्या खेळाडूंचे प्रदर्शन उत्तम राहिल अशा खेळाडूंचं जास्तीत जास्त संघामध्ये देण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे सर्व खेळाडू चांगलं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहेत. विजय शंकरच्या आजच्या धमाकेदार खेळीने निवड समितीचेही लक्ष वेधलं गेलं असावं. त्यामुळे वर्ल्ड कप संघ बांधणीसाठी हा अष्टपैलू भारतीय संघासाठी कुठेतरी एक महत्त्वाचा असू शकतो. यासाठी विजय शंकरला आपल्या खेळीत सातत्य राखावं लागणार आहे.

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | रशीद खान (कॅप्टन), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ आणि यश दयाल.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), एन जगदीसन, नितीश राणा (क), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, सुयश शर्मा, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.